बल्लारपूरातील पेपर मिल लगतच्या परिसरात बिबट्याने केली गायीची शिकार, नागरिकांत दहशतीचे वातावरण (A cow was hunted by a leopard in the vicinity of a paper mill in Ballarpur, an atmosphere of terror among the citizens)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर :- बल्लारपूर पेपर मिल गेट क्रमांक 7 जवळील नाग मंदिराच्या मागे एका बिबट्याने गायीवर हल्ला करून तिची हत्या केली.  ही बाब आज गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बल्लारपूर पेपर मिल गेट क्रमांक सात ते पॉवर हाऊस रेल्वे लाईनपर्यंत कंपनीच्या सुरक्षा भिंतीलगत नाला वाहतो. मोठमोठी झाडे-झुडपे असल्याने बिबट्याने या संकुलाला आपले घर बनवले आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी वनविभागाने याच संकुलातून एका बिबट्याला पकडून नेले होते.  मात्र आता पुन्हा बिबट्याचे दर्शन होत आहे.  तीन-चार दिवसांपूर्वी त्याने एक शेळी मारली होती आणि काल रात्री त्याने लाल गाय मारली होती.  गायीच्या मागील भागावर नखेच्या खुणा असून तिच्या मानेचा अर्धा भाग जनावराने खाल्ला आहे. या घडलेल्या प्रकारामुळं नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)