धक्कादायक ! अकोल्यात प्रेमविवाह करणार म्हणून वडिलांनेच स्वतःच्या पोटच्या मुलाची हत्या (Shocking ! The father himself killed his own son for a love marriage in Akola)

Vidyanshnewslive
By -
0
धक्कादायक ! अकोल्यात प्रेमविवाह करणार म्हणून वडिलांनेच स्वतःच्या पोटच्या मुलाची हत्या (Shocking !  The father himself killed his own son for a love marriage in Akola)
वृत्तसेवा :- अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवल्याची घटना घडली आहे. संदीप नागोराव गावंडे (वय २६) असं मृत तरुणाच नाव आहे. तर नागोराव कर्णाजी गावंडे असं मारेकरी वडिलांचं नाव आहे. मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले आणि आज दुपारी घरी परतले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अकोला बार्शीटाकळी तालुक्यातल्या टिटवा गाव या गावात नागोराव गावंडे हे वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुलं असून त्यातील एकाचं नाव संदीप आहे. मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. दरम्यान, संदीपच गावातील एका अनुसूचित जाती वर्गातील कुटुंबातील मुलीशी प्रेम होतं. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय घेतला. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं. याच्यावरून अनेकदा त्यांच्या घरात व्हायचा. त्यामुळ दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली. या दरम्यान त्याच्याच भावाने आणि वडिलांनी घरातच संदीपचा गळा आवळून संपवले. त्यानंतर संदीपच्या हात पाय वायरने बांधून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून गेले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)