उच्च शिक्षित तरुण आपले छंद पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरी करून विक्री करायचा, आरोपी युवकांला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक (A highly educated youth used to steal and sell two-wheelers to fulfill his hobby, the accused youth was arrested by the local crime branch.)

Vidyanshnewslive
By -
0
उच्च शिक्षित तरुण आपले छंद पूर्ण करण्यासाठी दुचाकी चोरी करून विक्री करायचा, आरोपी युवकांला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक (A highly educated youth used to steal and sell two-wheelers to fulfill his hobby, the accused youth was arrested by the local crime branch.)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी चोरी चे प्रकरण वाढत असल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई बाबत निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे 25 वर्षीय तरुण विना कागदपत्रांची दुचाकी वाहन विक्री करण्यासाठी आला आहे. एक उच्च शिक्षित तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे, दुचाकी चोरी प्रकरणात FINAL चे शिक्षण घेत असलेला उच्च शिक्षित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत तपास सुरू केला, त्याच दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी चोरी झाली होती. 25 वर्षीय एक तरुण रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपूर सदर आरोपी हा नागपुरातील एका महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. आरोपीला शेअर मार्केट चा छंद आहे, मात्र त्या छंदात त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाले होते, म्हणून तो दुचाकी चोरी करायचा आणि त्याची विक्री करून तो कर्ज फेडत होता. आरोपी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 दुचाकी तर चामोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत 1 दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे, स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी जवळून ऍक्टिव्हा क्रमांक MH34 BU7349, सिमेंट रंगांची एक्टिव्हा क्रमांक MH29AG4781, काळ्या रंगाची स्पलेंडर क्रमांक MH32S1335, एच एफ डीलक्स वाहन क्रमांक MH34BJ5773 जप्त करण्यात आला असून एकूण 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, नागेश येलपुलवार व नितीन रायपुरे यांनी केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)