महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात "मराठी भाषा गौरव दिन साजरा" ("Marathi Language Glory Day Celebration" at Mahatma Jyotiba Phule College)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंती दिनानिमित्त"मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. बादलशाह चव्हाण होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषनात कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रजत मंडल लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतिश कर्नासे यांनी तर आभार डॉ. पंकज कावरे यांनी मानले या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून डॉ. विनय कवाडे, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. किशोर चौरे, डॉ. रोशन फुलकर, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. पंकज नंदुरकर यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या