बल्लारपुर नगर परिषदेचा रु.29,53,374/- लक्ष अखेरच्या शिल्लकीचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर. (Ballarpur Nagar Parishad Budget Budget of Rs.29,53,374/- lakh closing balance submitted.)
बल्लारपूर :- बल्लारपुर नगर परिषदेने नगर पालिका अधिनियम 1965 चे कलम 101 तसेच 101 अ तरतुदी नुसार तयार केलेले सन 2024-25 चे अर्थसंकल्पीय रु. 123,87,68,243/- कोटी रुपयाचे अंदाजपत्रक आज दि. 22-02-2024 रोजी न.प. सभागृहात सर्वसाधारण सभा अयोजित करुन, मा . श्री. विशाल वाघ मुख्याधिकारी तथा प्रशासक, लेखापाल श्री. राजेश बांगर व न.प. अधिकारी/कर्मचारी यांचे उपस्थितीत मंजुर करण्यात आले. या अर्थसंकल्पा मध्ये बल्लारपुर नगर परिषदेने लोकहिताच्या दृष्टीकोनातून व विकासाचे दृष्टीने बल्लारपुर शहराचे विकास कामाकरिता प्राधान्य खर्चाच्या प्रमुख बाबी अर्थसंकल्पात नमुद केल्या आहेत यामध्ये दिव्यांगाकरिता 5% निधी रु. 25,06,020/-, दुर्बल घटकांकरिता 5% 25,06,020/-, महिला व बालकल्याण विकासाकरिता 5% 25,06,020/-, शिक्षणा करिता 5%, रमाई आवास योजनेकरिता 81 लाख तरतुद, प्रधानमंत्री आवास योनेकरिता 22 लक्ष तरतुद, दलीत वस्ती सुधार योजनेसाठी 10.12 कोटीची तरतुद, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरातील वाढीव पाणि पुरवठा योजना व सांडपाणि व्यवस्थापनासाठी (STP) तसेच शहरातील नागरिकांना 24 तास पाणि पुरवठा व्हावा यासाठी 11 कोटीची तरतुद, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सोयीसुविधा व जनजाग्रुतीसाठी 1.35 कोटीची तरतुद, करण्यात आली आहे बल्लारपुर शहराचा संपुर्ण विकास करण्याकरिता रस्ते, भुमीगत गटारे, चौका चौकाचे सौदर्गीकरण, प्रत्येक वार्डात विदयुत व्यवस्था याबाबत भरीव तरतुद करण्यात आली आहे व बल्लारपुर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी होमोपॅथीक आरोग्य केंद्राकरिता विशेष तरतुद करण्यात आलेली आहे.
हरित शहर व स्वच्छ शहर अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे बळकटीकरण, वृक्षरोपन, हरित पटट्याचा विकास, होडींग मुक्त शहर याकरिता तरतुद करण्यात आली असुन शहरातुन निघणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे करिता मलनिस्सारण प्रकल्प महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत राबविण्यात येणार आहे. तसेच 7 वे वेतन आयोगाकरिता 1.79 कोटी तरतुद करण्यात आली. अशा प्रकारे बल्लारपुर न.प.ने तयार केलेल्या सन 2024-25 चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक श्री. विशाल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी विशेष सभेसमोर सादर केले व लेखापाल श्री. राजेश बांगर यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. प्रारंभिक शिल्लकेसह एकुण संभाव्य उत्पन्न रु. 124,17,21,617/- एकुण संभाव्य खर्च रु. 123,87,68,243/- तर अखेरची शिल्लक रु.29,53,374/- या बाबत सविसतर माहिती मा. श्री. विशाल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी सभेला समजावुन सांगितली व सदर सभेनी सन 2024-25 च्या अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान केली. अंदाजपत्रकिय सभेचे संचालन कार्यालय अधिक्षक कु. संगिता उमरे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या