कारवा जंगलात बकरी चराई साठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, बल्लारपूर येथील घटना (A woman who went for goat grazing in the Karwa forest died in a tiger attack, an incident in Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
कारवा जंगलात बकरी चराई साठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, बल्लारपूर येथील घटना (A woman who went for goat grazing in the Karwa forest died in a tiger attack, an incident in Ballarpur)
बल्लारपूर :- बल्हारपुर शहरातील पंडीत दिनदयाल वार्ड येथील रहिवासी सौ. लालबची रामवध चौव्हाण हे दिनांक 26.02.2024 ला बल्हारपुर कारवा रोडने त्यांचे पती श्री. रामअवध खेखरमल चौव्हाण यांचे सोबत वनात बकरी चराईसाठी गेले असता दुपारी 12.00 वाजताचे सुमारास त्यांचेवर वाघ या वन्यप्राण्याने हल्ला करुन त्यांना जागीच ठार मारल्याबाबतची माहिती श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) यांना प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ मौका स्थळी हजर झाले. मौक्यावर पाहणी केली असता वाघाचे हल्यात सौ. लालबची रामवध चौव्हाण यांचा मृत्यु झाल्याचे दिसुन आले. त्याक्षणी मृत व्यक्तीचे शव ताब्यात घेवुन पोलीस विभागाचे कर्मचारी व मृत व्यक्तीचे नातेवाईक यांचे समक्ष मौका पंचनामा नोंदवुन शव शवविच्छेदना करीता पोलीस विभागाचे ताब्यात देण्यात आले. व मृत व्यक्तीचे नातेवाईकास तात्पुरती सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आले. सदर परिसरात गस्त वाढणविण्यात आलेली असुन वाघाचा मागोवा घेण्याकरीता 8 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहे. सदर प्रकरणात पुढील कार्यवाही मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, श्रीमती. श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक श्री. आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह श्री. नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. अशी माहिती नरेश रा. भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह (प्रादे) यांनी दिली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)