निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच (Big decision of election commission, party and symbol as nationalist party belongs to Ajit Pawar)

Vidyanshnewslive
By -
0
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच (Big decision of election commission, party and symbol as nationalist party belongs to Ajit Pawar)
वृत्तसेवा :- एखाद्या व्यक्तीन एखाद रोपटं लावणं त्या रोपट्याच एका मोठ्या वृक्षात रूपांतर होऊन फळ चाखण्याची वेळ आल्यावर ती फळ दुसऱ्याच कुणीतरी व्यक्तींनी चाखावी अशी परिस्थिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ना. शरद पवार यांची झाली आहे काँगेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातून फारकत घेत मा. शरद पवारांनी काही सहकार्याना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मात्र पक्षाच्या अंतर्गत कारनामुळं आज त्याच्याच ताब्यातून पक्ष व चिन्ह गमविण्याची वेळ आली आहे. अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाने ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणाने स्वीकारत आहे असं म्हटलं आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्ही आतिशय आनंदी आहोत. निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय देत भारतीय लोकशाही सिध्दातांवर शिक्कामोर्तब केलं आहे. याचे अंत:करणापासून स्वागत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठरवलेली ध्येय धोरणे ठरवून आम्ही काम करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्यात अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली आपली भूमिका योग्य पध्दतीने बजावेल आणि राज्यातील जनतेचा फार मोठा पाठिंबा पाठबळ आम्हाला मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो असं तटकरे यांनी म्हटलं आहे. आमदार अपात्रता निकाल १४ फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य लवकरच ठरणार आहे. शिवसेना निकालाहुन वेगळा आणि मोठा निर्णय येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)