बल्लारपूर पोलिसांची धाडसी कारवाई, जवळपास 980000 रु चा दारुसाठा जप्त (Bold action by Ballarpur police, confiscation of nearly Rs 980000 worth of liquor)
बल्लारपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच शहर म्हणून बल्लारपूर शहराची ओळख असून बल्लारपूर शहरात रोजगाराच्या शोधासाठी भारताच्या विविध प्रदेशातून लोक येतात. सध्याचा काळ लोकसभा निवडणुकीचा आहे त्यामुळं बदल्यांचे वारे वाहू लागले बल्लारपूरातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या त्यात बल्लारपूर चे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून श्री असिफरजा शेख यांनी कार्यभार स्वीकारताच गुन्हेगारावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बल्लारपूर शहरातील न्यू कॉलनी परिसरात कन्नमवार वार्ड गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून बल्लारपूर पोलिसांनी 9 फरवरी 2024 च्या रात्री 8:00 वाजताच्या सुमारास 980000 रु चा वाहनासह देशी दारू चा साठा जप्त केल्याची माहिती आहे. या कारवाई नंतर वाहन चालक पसार झाला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री असिफरजा शेख याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण कडू, पोलीस उपनिरीक्षक साठे, रनविजय ठाकूर, श्रीनिवास वाभीटकर, वशिष्ट रंगारी यांच्यासह पोलीस कर्मचारी या पथकात होते. या संदर्भात पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या