महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात करियर समुपदेशनातून मान्यवरांचे मार्गदर्शन (Guidance of dignitaries through career counseling through placement department of Mahatma Jyotiba Phule College)
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. कायक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालमुकुंद कायरकर यांनी करतांना विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी महाविद्यालयात विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना मा. शुभांगी नगराळे यांनी म्हण्टले की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बौद्धीक विकासाबरोबर उपजीविका महत्वाची असते त्यासाठी रोजगार महत्वाचा असतो व अदानी स्किल डेव्हलोपमेंट च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.
तदनंतर मा. हितेश डोर्लिकर यांनी आपल्या संबोधनातून म्हण्टले की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावे करियर करतांना विश्वास, जिद्द, वक्तशीरपणा, इमानदारी बाळगण्याचा प्रयत्न करावा तसेच विद्यार्थ्यांनी संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. यानंतर आपल्या अध्यक्षीय संबोधनातुन प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगायला हवा. विद्यार्थ्यांनी रोजगारसोबतच आपल्या अंगी असलेल्या कौशल्य व सुप्त गुणांचा योग्य वापर करावा. या कार्यक्रमाचे संचलन कु. अलींना सय्यद यांनी केले या कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, डॉ. किशोर चौरे, डॉ. पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, ई ची उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या