भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करा - बल्लारपूरातील आंबेडकरी अनुयायाची मागणी (Take immediate action against social miscreant who desecrates idol of Lord Buddha - Ambedkari follower in Ballarpur demands)

Vidyanshnewslive
By -
0

भगवान बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करा - बल्लारपूरातील आंबेडकरी अनुयायाची मागणी (Take immediate action against social miscreant who desecrates idol of Lord Buddha - Ambedkari follower in Ballarpur demands)

बल्लारपूर :- येथील आंबेडकरी अनुयानीच्या वतीने मंगळवार, २ जानेवारी रोजी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भद्रावती शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवरील भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना केल्याची घटना सोमवार, १ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या ऐतिहासिक बुद्ध लेणी टेकडीवर भगवान गौतम बुद्धाची मूर्ती होती. या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली. अशा प्रकारच्या घटनांमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात तत्काळ कारवाई करून दोषींना अटक करने आवश्यक आहे. या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करून कारवाही ची मागणी समस्त आंबेडकरी अनुयायी ने तहसीलदार, तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन द्वारे करण्यात आले.

         दरम्यान भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन बुध्द लेणी परीसरातील खंडित मूर्तीच्या ठिकाणी एक नवीन बुध्द मूर्ती बौध्द भिक्षु व संघाच्या तसेच उपासक व उपासिकाच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आली तसेच यावेळी उपस्थित भिक्षु संघाने शांततेचे आवाहन केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)