केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याला बल्लारपूरात विरोध, ३ जानेवारी पासून वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा Protests in Ballarpur against Central Government's new Motor Vehicle Act, warning to shut down traffic from January 3

Vidyanshnewslive
By -
0
केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याला बल्लारपूरात विरोध, ३ जानेवारी पासून वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा Protests in Ballarpur against Central Government's new Motor Vehicle Act, warning to shut down traffic from January 3
बल्लारपूर :- केंद्र सरकारने नवा मोटार वाहन कायदा तयार केला. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करून लोकल ट्रान्सपोर्ट वेल्फेअर सोसायटी वाहनचालकांनी उद्या ३ जानेवारी पासून वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. संघटनांनी सोमवारी आंदोलन केले. पंतप्रधान भारत सरकार यांना पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्फत निवेदन देऊन हा कायदा रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. या काळया कायदयाच्या विरोधात वाहन चालकामध्ये तिव्र संताप आहे. वाहन चालकावर अन्याय करणारा जुलमी अत्याचारी नविन मोटार वाहन कायदा रद्द करावा दुचाकी वाहने, आटो चालक, ट्रॅक्टर चालक, काळी-पिवळी जिप चालक व टूक चालविणा-या चालकाला वाहन चालविण्यास भिती वाटत आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. उद्या ३ जानेवारी पासुन सर्व वाहन बंद ठेवण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन देताना लोकल ट्रान्सपोर्ट वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष नरेश मुंदडा, ऑटो संघटन चे शेख अब्बास भाई, उपेन्द्र यादव, प्रदिप, अभीमान, छेदीलाल, मोहीत, विजय, सूधिर यादव, बिहारी,अशोक, जयप्रकाश, राम सुरेश साहू, लाला साहू, बापुराव कोरडे, अमोल कोडापे सह आदी वाहन, ऑटो चालक उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)