राजुरा -वरुर मार्गावरील साईकृपा पेट्रोल लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या तेलंगणा सीमेवर अटक (Robbers robbing Saikrupa petrol on Rajura-Varur route arrested at Telangana border)

Vidyanshnewslive
By -
0
राजुरा -वरुर मार्गावरील साईकृपा पेट्रोल लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या तेलंगणा सीमेवर अटक (Robbers robbing Saikrupa petrol on Rajura-Varur route arrested at Telangana border)
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा -वरुर मार्गावरील साईकृपा पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना पाच बुरखाधारी तरुणांनी बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले होते. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या तेलंगणा सीमेवरच्या आसिफाबाद मार्गावरच्या पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा पडला होताय पिस्तुलचा धाक दाखवत दरोडेखोरांनी 2 लाखांची रोकड लुटली होती. रात्री 2 वाजता हा दरोडा पडला होता. 5 दरोडेखोरांना पंपावरील केबीनमध्ये प्रवेश केला. पिस्तुलच्या धाक दाखवत लुटण्यात आले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. मारुती शेरकुरे (31), दीपक देवगडे (22), नंदकिशोर देवगडे (19), महेश देवगडे (22) दत्तू काळे (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या बंदुका, कोयता देखील जप्त करण्यात आला आहे. अवघ्या बारा तासात तेलंगणा सीमेवरील या मोठ्या दरोड्याच्या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळून चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तडफदार कारवाई केली आहे. या धाडसी दरोड्यानंतर पोलिसांनी अनेक तपास पथकं तयार करून नाकाबंदी केली. सीसीटीव्हीमध्ये कैद आरोपींबाबत राजुरा उपविभागात जोरदार तपासचक्रे चालवल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)