महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न, पत्रकारांनी निर्भीडपणे समजहितासाठी काम करावे - आ. सुधाकरराव अडबाले (Maharashtra State Marathi Journalist Association's Abhishtachintan ceremony concluded with grandeur, journalists should work fearlessly for the sake of understanding - Aa. Sudhakarrao Adbale)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न, पत्रकारांनी निर्भीडपणे समजहितासाठी काम करावे - आ. सुधाकरराव अडबाले (Maharashtra State Marathi Journalist Association's Abhishtachintan ceremony concluded with grandeur, journalists should work fearlessly for the sake of understanding - Aa.  Sudhakarrao Adbale)
भद्रावती :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी  उपक्रम राबवून १ जानेवारी रोजी भद्रावती येथे जिल्हा शाखा चंद्रपूर व तालुका शाखा भद्रावती  तर्फे अभीष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न झाला. भद्रावती येथील स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात सकाळी ११:३० वाजता आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले  यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक तथा राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमानी हे होते.यावेळी संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, शिक्षण तज्ज्ञ प्रा.नाहिद हुसेन, भा.ज.यु.मो. प्रदेश सचिव करण देवतले, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, विदर्भ्  विभगिय अध्यक्ष प्रा.महेश पानसे .जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. या अभीष्टचिंतन सोहळ्यात दिनदर्शिका प्रकाशन, गुणवंतांचा सत्कार,पदाधिकारी मेळावा, अंध-अपंग विदयार्थी यांना साहित्य वाटप इत्यादी उपक्रम पडले. मान्यवरांच्या हस्ते आनंदवन वरोरा येथे व्यवस्थापकिय अधिक्षक पदावर कार्यरत रवींद्र नलगींटवार यांना सामाजिक व नाट्यक्षेत्रातील, सांस्कृतीक क्षेत्रातील, अपंगसेवेतील बहुआयामी कार्याबद्दल तर प्रणव भशाखेत्रे याची आय.आय.टी येथे निवड झाल्याबद्दल, आंतरराष्टीय कबडडीपटू धिरज पासी यांना क़िडाक्षेत्रातील योगदानासाठी 
गुणवंत म्हणून सन्मानित करण्यात आले. राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य मनिष रक्षमवार यांना गोसेवा, जनसेवेतील योगदानासाठी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मान्यवर राज्य प्रमुखांचा वाढदिवस केक कापून मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला.
       आपल्या उदघाटनपर भाषणात शिक्षक आमदार यांनी जनतेचे प्रश्न पुढे आणल्यास हमखास सुटतात हे स्पष्ट करून पत्रकारांचे योगदान अतुलनिय असल्याचे सांगून समाजाला शिक्षीत करण्यासाठी पत्रकार  बांधवानी निर्भीडपणे काम करून चौथ्या स्तंभाचा बाणा कायम ठेवावा असे आवाहन केले. राज्य पत्रकार संघातर्फे आ. अडबाले यांचा सहदय सत्कार विदर्भ अध्यक्ष निलेश सोमानी, विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे, विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव यांचे हस्ते यावेळी करण्यात आला. ईलेव्हेट समूहाचे संचालक तथा शिक्षण तज्ञ प्रा.नाहिद हुसेन यांचे हस्ते संत गजानन महाराज विद्यालयातील मतिमंद ३१ विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट्स वाटप करण्यात आले. या सोहळ्यात जिल्यातील व तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संघाचे जिल्हयातील सर्व तालुका अध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे  यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात राज्य पत्रकार संघातर्फे साजरा करण्यात येतो. यानिमित्य विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले  जातात अशी माहिती यावेळी विभागीय अध्यक्ष  प्रा.महेश पानसे यांनी दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणातून विदभं अध्यक्ष निलेश सोमानी यांनी राज्यात पत्रकार संघाचे महत्व व कार्य विषद करून संघटनेने व्यक्ती मोठा होत असल्याचे स्पष्ट केले. या सोहळ्याचे सुंदर संचालन व आभारप्रदर्शन जिल्हा संघटक रुपचंद धारणे यांनी केले. भद्रावती तालुका अध्यक्ष  शंकर बोरघरे, सरचिटणीस शाम चटपल्लीवर, जिल्हा संघटक रुपचंद धारणे व तालुका शाखेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या पुढाकारातून जिल्हा शाखेच्या मार्गदर्शनात हा सोहळा संपन्न झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)