राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं ; एका धार्मिक सोहळ्याच राजकीय फायद्यासाठी राजकीय प्रचार केला जातोय (Prakash Ambedkar rejected the invitation to the Ram Mandir ceremony; Political propaganda is being done for political gain in a religious ceremony)

Vidyanshnewslive
By -
0
राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण प्रकाश आंबेडकरांनी नाकारलं ; एका धार्मिक सोहळ्याच राजकीय फायद्यासाठी राजकीय प्रचार केला जातोय (Prakash Ambedkar rejected the invitation to the Ram Mandir ceremony;  Political propaganda is being done for political gain in a religious ceremony)
वृत्तसेवा :- येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. त्याचसोबत अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकरांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला पत्र लिहून कळवलं की, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. परंतु या कथित सोहळ्यात मी सहभागी होणार नाही. कारण भाजपा आणि आरएसएसने या सोहळा हाती घेतला आहे. एका धार्मिक सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे. माझे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जर राजकीय पक्ष धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवतील तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येऊ शकते. कदाचित हे स्वातंत्र्य आपण कायमचे गमावून बसू असं सांगितले होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही रामजन्मभूमी न्यासकडून सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले.
         परंतु हा धार्मिक सोहळा निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी सोहळ्याला जाण्यास नकार दिला आज बाबासाहेबांनी जी भीती व्यक्त केली होती ती खरी ठरत आहे. धर्म, पंथ याला देशापेक्षा सर्वोच्च ठेवणाऱ्या भाजपा आणि आरएसएसने त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या सोहळ्यावर कब्जा केला आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली. पत्राच्या शेवटी आंबेडकरांनी जय फूले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम असा उल्लेख केला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)