बल्लारपूर येथे रन फॉर मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन (Organization of Run for Marathon competition at Ballarpur)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर येथे रन फॉर मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन (Organization of Run for Marathon competition at Ballarpur)
बल्लारपूर. :- स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून सेल्फ हेल्प ग्रुप (एस. एच्.जी) ग्रुपच्या वतीने बल्लारपूर येथे तालुका स्तरीय रन फॉर मॅरॅथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि मॅरॅथॉन स्पर्धा रविवारी (ता.१४) जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहेत. नेहमी सामाजिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या शहरातील सेल्फ हेल्प ग्रुप (सोसायटी) ग्रुपच्या वतीने येत्या १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता बल्लारपूर येथे तालुका स्तरीय मॅरॅथॉन स्पर्धा घेतली जात आहे. हि स्पर्धा पेपरमिल कलामंदिर ते पत्ता गोडाऊन पर्यंत असणार आहे. स्पर्धेनंतर लगेच पेपरमिल कलामंदिर येथे स्पर्धेचा बक्षीस सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. उदय कुकडे साहेब, मुख्य प्रबंधक बल्लारपूर पेपर मिल समूह, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पोलिस निरीक्षक मा.श्री. उमेश पाटील साहेब, तर प्रमुख पाहुणे म्हणून हरीश शर्मा यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. तालुका स्तरीय 'रन फॉर मॅरॅथॉन स्पर्धेत' जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन स्पर्धेचे आयोजक सेल्फ हेल्प ग्रुप (एस. एच.जी)सोसायटी ग्रुप'च्या वतीने करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)