डॉ. बादलशाहा चव्हाण यांच्याद्वारे संपादित "सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष " ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न (The publication ceremony of the book "The Struggle of Social Existence" edited by Dr. Badalshah Chavan was concluded)

Vidyanshnewslive
By -
0
डॉ. बादलशाहा चव्हाण यांच्याद्वारे संपादित "सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष " ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न   (The publication ceremony of the book "The Struggle of Social Existence" edited by Dr. Badalshah Chavan was concluded)


बल्लारपूर :- स्थानिक महात्मा जोतिबा  फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाहा चव्हाण यांनी संपादित केलेला " सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष " या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा गुरुवार दि. 11 जानेवारी 2024 ला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर, भाष्यकार म्हणून प्रा. डॉ. संजय लाटेलवार, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि प्रा. डॉ. रविंद्र मुरमाडे, डॉ. खत्री महाविद्यालय चंद्रपूर, हे होते. विचारमंचावर  प्रा. डॉ. बादलशाहा चव्हाण, प्रा. डॉ किशोर चौरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली.  प्रास्ताविक डॉ. बादलशाहा चव्हाण यांनी केले. त्यांनी शिक्षण हे महत्वपूर्ण असून सामाजिक जीवन जगतांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते अशी भूमिका मांडली. यानंतर "सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष " यावर भाष्य करतांना प्रा. डॉ. रविंद्र मुरमाडे  म्हणाले की " स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही चतुसूत्री अजूनही प्रत्यक्षात अमलात आली नसून दलित लेखकानी मोठ्या पोटतिडकीतून साहित्याची निर्मिती केली.

   
   " सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष "  हा ग्रंथ डॉ. सुशीला ढगे यांच्या लघुशोध प्रबंधाचे पुस्तक रूपाने केलेले संपादन आहे. हा ग्रंथ दलित कादंबरीचे महत्व पटवून देणारा आहे. आणि म्हणूनच महत्वाचा आहे. प्रा. डॉ. संजय लाटेलवार यांनी " पारधी " या  कादंबरी वर प्रकाश टाकला. उच्च शिक्षण घेऊन नौकरी मिळविल्यानंतरही समाज व्यवस्था सर्वसामान्यावर किती  अत्याचार करते याचे विवेचन या कादंबरीत आले आहे. असे ते म्हणाले.

      
        कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर म्हणाले, की प्रत्येकानी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच प्रत्येक प्राध्यापकांनी ग्रंथलेखन करून  विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकावी असे आवाहन त्यांनी  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सतिश कर्नासे यांनी तर आभार  प्रा. डॉ. किशोर चौरे मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ. रजत मंडल, डॉ. विनय कवाडे, डॉ. रोशन फुलकर, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. पंकज कावरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, ले. प्रा योगेश टेकाडे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. ललित गेडाम, प्रा. दिवाकर मोहितकर, प्रा. रोशन साखरकर, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थिती होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)