महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाच आयोजन (Mahatma Jyotiba Phule College organized an educational program on the occasion of Rajmata Jijau and Swami Vivekananda Jayanti.)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाच आयोजन (Mahatma Jyotiba Phule College organized an educational program on the occasion of Rajmata Jijau and Swami Vivekananda Jayanti.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 12 जानेवारी राजमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त सांस्कृतिक विभाग व सैन्य विज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ कायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. यश बागडे, सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, मा. चिन्मय भागवत, संघटन मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मा. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य, प्रा. शुभांगी भेंडे, समाजशास्त्र विभाग, प्रा. ले. योगेश टेकाडे, सैन्य विभाग ई ची विचार पिठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला वंदन करून झाली.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभांगी भेंडे यांनी केले तदनंतर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना चिन्मय भागवत म्हणाले की " स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणातून समाजाचा एक जागृत नागरिक म्हणून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यार्थ्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरते. " तसेच मा. यश बागडे यांनी मार्गदर्शन करतांना " विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीला सामोरे जातांना सर्वांगीण विकास साधला पाहिजे तसेच थोर समाज सुधारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. यानंतर प्रा. ले योगेश टेकाडे व प्रा. स्वप्नील बोबडे यांनी कवितेच्या माध्यमातून मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले. अध्यक्षीय स्थानावरून मनोगत व्यक्त करतांना डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की, " राजमाता जिजाऊ या स्त्री जीवनातील एक आदर्श व्यक्तिमत्व असून छत्रपती शिवाजी महाराज सारखा एक आदर्श राजाची घडणं त्यांनी केली. तसेच स्वामी विवेकानंदाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा तसेच देशातील भविष्यातील भारत घडविण्यासाठी हातभार लावावा. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी "
        ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. पंकज कावरे यांच्या पुढाकारांतून स्वामी विवेकानंद व मा जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला डॉ. रोशन फुलकर, डॉ. विनय कवाडे, डॉ. रजत मंडल, डॉ. किशोर चौरे, डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. सतिश कर्णासे, प्रा. स्वप्नील बोबडे, डॉ. पंकज कावरे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. श्रद्धा कवाडे यांच्या शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु गायत्री तर आभार डॉ. पंकज कावरे यांनी मानले. कार्यक्रमाची शेवट राष्ट्रगीताने झाला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)