महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र आणि सांस्कृतिक विभागाद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी (Krantijyoti Savitribai Phule Jayanti Celebration by Department of Sociology and Culture at Mahatma Jyotiba Phule College Ballarpur run by Maharashtra Education Broadcasting Board)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे समाजशास्त्र आणि सांस्कृतिक विभागाद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी (Krantijyoti Savitribai Phule Jayanti Celebration by Department of Sociology and Culture at Mahatma Jyotiba Phule College Ballarpur run by Maharashtra Education Broadcasting Board)
बल्लारपूर :- दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त समाजशास्त्र आणि सांस्कृतिक विभागाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संजयभाऊ कायरकर, प्रमुख पाहुणे लाभशंकर कायरकर तसेच महाविद्यालयाचे प्रा. स्वप्निल बोबडे, प्रा. डॉ.रोशन फुलकर, प्रा. डॉ.रजत मंडल, प्रा.डॉ. बालमुकुंद कायरकर तसेच समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा उपस्थित उपस्थित होते.
          कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम सावित्रीबाईच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि द्विप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय संजयभाऊ कायरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या गुणाचा कशा पद्धतीने अंगीकार आपल्या जीवनात केला पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रा. स्वप्नील बोबडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरच्या स्वरितरचित कविता चे वाचन करून कार्यक्रमाला उपस्थित सर्वांची मने जिंकली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना चे प्रमुख प्रा.डॉ. रोशन फुलकर यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचे महत्त्व, स्त्री सबलीकरण याबाबत आपले विचार मांडले.
          त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. योगेश टेकाडे, .डॉ.पंकज कावरे, .डॉ. किशोर चौरे,  प्रा.सतिश कर्णासे, डॉ.पल्लवी जुनघरे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. विभावरी नखाते, प्रा.श्रद्धा कवाडे, प्रा. कृष्णा लाभे, प्रा.सनी मेश्राम आणि आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मोहनिश माकोडे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)