सत्ता संघर्षाचा निकाल, शिंदेसेना खरी शिवसेना, मात्र दोन्ही गटाचे आमदार पात्र, 'सर्वोच्च' न्यायालया कडे पुन्हा वाटचाल (Result of power struggle, Shindesena real Shiv Sena, but MLAs of both factions qualified, move towards 'Supreme' court again)

Vidyanshnewslive
By -
0
सत्ता संघर्षाचा निकाल, शिंदेसेना खरी शिवसेना, मात्र दोन्ही गटाचे आमदार पात्र, 'सर्वोच्च'कडे पुन्हा वाटचाल (Result of power struggle, Shindesena real Shiv Sena, but MLAs of both factions qualified, move towards 'Supreme' again)
मुंबई :- मागील दीड ते पावणे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचन केले. यावेळी दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरविण्यात आले आहे. मग पराभव झाला कुणाचा? असा प्रश्न सध्या उपस्थित केल्या जात आहे. 21 जून 2022 च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही. केवळ संपर्काच्या बाहेर गेले या कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सूरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. यामुळेच शिंदे गटाचे आमदार पात्र ठरले आहेत. शिंदे गटातील आमदारांना पात्र ठरविण्यात आल्यानंतर ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरविल्यास मोठी रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे एक सुवर्णमध्ये साधला गेला असून, दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं गेलं नाही. त्यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेचा हा निर्णय सर्वोच्य न्यायालयात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत अभूतपूर्व बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तेत सामील झाले. त्यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यान्वये याचिका दाखल केली. त्याचवेळी शिंदे गटाच्या वतीनेही ठाकरे गटातील 14 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही. असे असतानाच मात्र, खरी शिवसेना कुणाची याबाबत निर्णय घेताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)