आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघेच्या वतीने बल्लारपूरात 7 जानेवारीला भव्य निशुल्क रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन (On behalf of Acharya Vinoba Bhave Rural Hospital Sawangi Meghe organized a grand free diagnosis and treatment camp at Ballarpur on 7th January.)

Vidyanshnewslive
By -
0
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघेच्या वतीने बल्लारपूरात 7 जानेवारीला भव्य निशुल्क रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन (On behalf of Acharya Vinoba Bhave Rural Hospital Sawangi Meghe organized a grand free diagnosis and treatment camp at Ballarpur on 7th January.)
बल्लारपूर :- येत्या 7 जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघेच्या वतीने बल्लारपूरातील स्थानिक डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा (जुनी गांधी विद्यालय जुना बस स्थानक परिसरात भव्य निशुल्क रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात 100 हुन अधिक आजारावर उपचार करण्यात येणार असून यासाठी सावंगी मेघे वर्धा येथून 70 पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू व 120 हुन अधिक वैद्यकीय सहायकांचा स्टाफ दाखल होणार आहे. विशेष बाब म्हणजे यात कर्क रोग(कॅन्सर) सारख्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णावर निशुल्क उपचार व मार्गदर्शन होणार आहे. यासाठी 2000 हुन अधिक रुग्णाची नोंदणी झाली असून यात अधिकाधिक रुग्णावर उपचार केले जाणार आहे यासाठी रुग्णांनी आधार कार्ड, व राशन कार्ड सोबत आणायचे आहे. विशेष म्हणजे पुढील उपचारासाठी सावंगी मेघे वर्धा येथे जाण्यासाठी व येण्यासाठी मोफत सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर माहिती बल्लारपूर येथील स्थानिक विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला जेष्ठ भाजप नेते चंदनसिहं चंदेल, हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर, काशिनाथ सिंग, तालुकाध्यक्ष, मनीष पांडे, समीर केणे, रंनंजय सिंग, निलेश खरबडे ई ची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)