पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम ! विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडी, शिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक (A world record was created in Chandrapur from the concept of Guardian Minister Sudhir Mungantiwar! More than 7000 kg of khichdi made by Vishnu Manohar, disciplined organization and distribution system is universally appreciated.)

Vidyanshnewslive
By -
0
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम ! विष्णू मनोहर यांनी बनवली 7000 किलो पेक्षा अधिक खिचडी, शिस्तबद्ध आयोजन व वाटप व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक (A world record was created in Chandrapur from the concept of Guardian Minister Sudhir Mungantiwar!  More than 7000 kg of khichdi made by Vishnu Manohar, disciplined organization and distribution system is universally appreciated.)
चंद्रपूर :- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज (दि.5) 7 हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला. राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे सुरू कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार साजरे करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त विष्णू मनोहर यांनी  चंद्रपूर येथे मिलेट खिचडी बनवून संपूर्ण जगाला "मिलेट" चे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 5 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता विक्रमी खिचडी बनविण्यास सुरुवात करण्यात आली. 6750 किलो खिचडी बनविण्याचा संकल्प विष्णू मनोहर यांनी केला होता. ही खिचडी बनवण्याची पद्धत रेसिपी आणि मोठमोठ्या कढयांमधून टाकण्यात येणारे पदार्थ याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. चंद्रपूर येथे करण्यात आलेला विक्रम  महाराष्ट्रातील बळीराजाला समर्पित करण्याचा निर्धार यावेळी विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्म्याच्या प्रकल्प अधिकारी प्रीती हिरळकर, राहुल पावडे, प्रकाश धारणे उपस्थित होते.
        खिचडीचे शिस्तबद्ध वाटप 7000 किलो पेक्षा जास्त झालेली ही खिचडी याचे वाटप कसे करावे हा प्रश्न सर्वांनाच उत्सुकतेपटी पडलेला होता. परंतु जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी संपूर्ण यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने कामाला लावून ही खिचडी शाळांमध्ये तसेच शहरातील वस्त्यांमध्ये वाटण्याची व्यवस्था केली. कृषी प्रदर्शनाच्या स्थळी विविध स्टॉलवर असलेल्या प्रत्येक माणसाला ही खिचडी देण्यात आली. शहरातील 35 हजार लोकांपर्यंत ही खिचडी पोहोचेल, अशी व्यवस्था पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी मानले विष्णु मनोहर यांचे आभार पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नागपूरला असल्याने त्यांनी फोनवरून विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या आणि चंद्रपुरात हा विश्वविक्रम केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी मिलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेटचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता.  त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी मिलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत. चांदा एग्रोमध्‍ये विष्‍णू मनोहर शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पुर्णान्‍न असलेली खिचडी तयार केली.  त्‍यासाठी 10 फूट व्‍यासाची, 5 फूट उंचीची कढई आणि  सुमारे 500  किलो लाकूड वापरण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)