कला-वाणिज्य महिला महाविद्यालयात प्रा. किशोर चौरे, (इतिहास) व प्रा दिपक भगत (राज्यशास्त्र) विषयाच्या प्राध्यापकांचे गेस्ट लेक्चर (Arts and Commerce Women's College Prof. Guest Lecture by Prof. Kishore Chaure, (History) and Prof. Deepak Bhagat (Political Science).

Vidyanshnewslive
By -
0
कला-वाणिज्य महिला महाविद्यालयात प्रा. किशोर चौरे, (इतिहास) व प्रा दिपक भगत (राज्यशास्त्र) विषयाच्या प्राध्यापकांचे गेस्ट लेक्चर (Arts and Commerce Women's College Prof.  Guest Lecture by Prof. Kishore Chaure, (History) and Prof. Deepak Bhagat (Political Science).
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक कला-वाणिज्य महिला महाविद्यालयात बल्लारपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील इतिहास विभागाचे डॉ. किशोर चौरे, व राज्यशास्त्र विभागाचे प्रा. दिपक भगत यांचे गेस्ट लेक्चर(अतिथी मार्गदर्शन) म्हणून मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र केवट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रमोद घ्यार, (इतिहास विभाग प्रमुख), यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी डॉ. प्रमोद घ्यार,  डॉ. किशोर चौरे, इतिहास विभाग प्रमुख, प्रा. दिपक भगत, राज्यशास्त्र विभाग यांची विचार पिठावर उपस्थिती होती.
      यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. किशोर चौरे सर म्हणालेत की, " विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना सोबतच चर्चात्मक अभ्यासावर भर द्यावा, नवनवीन कौशल्य व तंत्रचा वापर करावा तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यास करतांना केवळ परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यास न करता ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. तसेच इतिहास व राज्यशास्त्र विषय रटाळ नसून स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. तसेच नुकतीच पार पडलेल्या सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने स्त्री शिक्षणामुळे महिलांनी मोठया प्रमाणावर प्रगती केली असून वर्तमान स्थितीत महिलांनी देशाच्या राष्ट्रपती म्हणून सर्वोच्च स्थान प्राप्त केले. " यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)