प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह देशभरातून महामानवाला अभिवादन, जगाच्या कानोकोपऱ्यातून चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर लोटला (Prime Minister Narendra Modi, Chief Minister, Deputy Chief Ministers from all over the country greeted the great man, Lakhs of people from all corners of the world flocked to Chaityabhoomi.)

Vidyanshnewslive
By -
0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह देशभरातून महामानवाला अभिवादन, जगाच्या कानोकोपऱ्यातून चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर लोटला (Prime Minister Narendra Modi, Chief Minister, Deputy Chief Ministers from all over the country greeted the great man, Lakhs of people from all corners of the world flocked to Chaityabhoomi.)
मुंबई :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत सर्व रस्त्यांवर मोठी गर्दी जमा झाली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून बौद्ध अनुयायी दादरमध्ये (Dadar) दाखल झाले आहेत. लांबुन आलेल्या अनुयायांसाठी राहण्याची व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात आलीये. तसेच जेवणासह इतर सुविधांची देखील सोय करण्यात आली आहे. यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आहेत. नागरिकांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरी साहित्य खरेदीवर भर दिला आहे.
         महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार, राहुल शेवाळे, दीपक केसरकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले आहे. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील खेड्यापाड्यातून लाखो महिला- मुली येतात असतात. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आलेल्या १००० महिला- मुलींना भाकर फाऊंडेशनमार्फत "सॅनिटरी पॅडचे" वाटप करण्यात आले. तसेच आज ६ डिसेंबरला देखील वाटप करण्यात येणार आहे. या सामाजिक कार्यातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलेय. आपल्या देशाचा कारभार बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे चालतो. त्यांचे अनुयायी फक्त देशभरात नाही तर जगभरात आहेत. इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे स्मारक डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी आपले जीवन शोषित आणि वंचितांच्या कल्याणासाठी समर्पित केले. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ट्वीट पोस्ट करत अभिवादन केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)