महात्मा फुले महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, डॉ. आंबेडकर एक व्यक्ती नसून विचारधारा होय - डॉ. बादलशाह चव्हाण (Mahatma Phule College Greetings to Dr. Babasaheb Ambedkar, Dr. Ambedkar is not a person but an ideology - Dr. Badalshah Chavan)

Vidyanshnewslive
By -
0
महात्मा फुले महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, डॉ. आंबेडकर एक व्यक्ती नसून विचारधारा होय - डॉ. बादलशाह चव्हाण (Mahatma Phule College Greetings to Dr. Babasaheb Ambedkar, Dr.  Ambedkar is not a person but an ideology - Dr.  Badalshah Chavan)
बल्लारपूर :- मी प्रथम भारतीय व अंतिम भारतीय अशी घोषणा करणारे प्रसंगी आपल्या लाडक्या मुलाच्या प्रेत समोर असतांनाही समाजहीत लक्षात घेणारे विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन त्या निमित्ताने देशभरात अभिवादन पार पडत असतांना बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रोशन फुलकर, डॉ. बादलशाह चव्हाण, प्रभारी प्राचार्य, प्रा. स्वप्नील बोबडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
            याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा. बोबडे सरांनी महामानवाच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच बाबासाहेबावरील " माझा भीमराय " ही कविता शब्दातून मांडली. तसेच आपले अध्यक्षीय मत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण म्हणालेत की " बाबासाहेब केवळ एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे ज्यांनी या देशाचा वर्तमान काळचं नव्हे तर भविष्यकाळाची दिशा व धोरण ठरविले, रक्ताचा एक थेंब ही न पडता या देशात आमुलाग्र लोकशाहीच्या माध्यमातून बदल घडवून आणला, भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, न्याय, बंधुता ही सामाजिक न्यायाची तत्व आपल्याला बहाल केली." या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रोशन फुलकर यांनी केले. यावेळी डॉ. विनय कवाडे, डॉ. किशोर चवरे, डॉ. रजत मंडल, डॉ. बालमुकुंद कायरकर, डॉ. पल्लवी जुनघरे, डॉ. पंकज कावरे, प्रा. सतिश कर्नासे, प्रा. शुभांगी भेंडे शर्मा, प्रा. ले. योगेश टेकाडे, प्रा. रोशन साखरकर, प्रा. ललित गेडाम, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, प्रा. दिपक भगत, प्रा. मोहनीश माकोडे, प्रा. श्रद्धा कवाडे, प्रा. विभावरी नखाते, प्रा. सनी मेश्राम, प्रा. कृष्णा लाभे, प्रकाश मेश्राम, शामराव दरेकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)