महापरिनिर्वाण दिना निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात दारूचे दुकान बंद ठेवावी, उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची मागणी (On the occasion of Mahaparinirvan Day, Liquor shops should be closed in Chandrapur district, Ulgulan Association President Raju Zode demanded.)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर :- 6 डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. अशातच अवघा देश दुःखाच्या सागरात बुडाला असताना दारूचे दुकान बिनधास्तपणे सुरू असतात. त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दारूचे दुकाने बंद ठेवावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे. विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन येत्या 6 डिसेंबरला आहे. या दिवशी अवघ्या देश भरात त्यांना अभिवादन करण्यात येते तर ठिकठिकाणी कँडल मार्च काढून त्यांना अभिवादन करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा सर्व तालुक्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान काही समाजकंटक दारूच्या नशेत राहत असून अनुचित घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं 6 डिसेंबर ला जिल्ह्यात सर्व दारूची दुकाने बंद ठेवावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)