जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी २० डिसेबरला शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर जय्यत तयारी सुरु. Government Industrial Training Institute Chandrapur Jayat Preparations for District Level Technical Exhibition on 20th December.
चंद्रपूर :- कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत संपुर्ण राज्यभरात जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी आयोजीत करण्यात येत असून चंदपूर जिल्ह्यात तंत्र प्रदर्शनीचे आयोजन भव्य स्तरावर २० डिसेंबरला शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. संपुर्ण चंदपूर जिल्यातील शाशकिय, अशासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था यात सहभागी होणार असून यात जिल्हाभरातून शेकडो मॉडेलस व मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित होणार असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मेहंदळे यांनी कळविले आहे. सदर तंत्र प्रदर्शनीचे उदघाटन नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांचे हस्ते होणार असून एम.आय.डि.सी. चंदपूरचे चेअरमन
मधुसुदन रूंगठा, शिक्षणमहषीं पांडुरंग
आंबटकर हे प्रमुख अतिथी असणार आहेत. या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीतून १० मॉडेलस ची राज्य स्तरीय प्रदर्शनी करिता निवड करण्यात येणार असून राज्य स्तरीय प्रदर्शनीत राज्यातून निवडक ३६० मॉडेल्स सहभागी होणार असल्याचे रवींद्र मेहंदळे यांनी सांगितले. जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी चे नियोजनाकरिता विविध समित्या तयार करण्यात आल्या असून जय्यत तयारी सुरु असल्याचे प्रा. महेश पानसे, प्रा. गुणवंत दर्वे, शालिक फाले, प्रभाकर धोटे, अमोल धात्रक, व इतर नियोजन समिती सदस्यानी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या