अबब ! वयाच्या 97 वर्षात आजीबाईंनी मिळवली पदव्यूत्तर पदवी

Vidyanshnewslive
By -
0
अबब ! वयाच्या 97 वर्षात आजीबाईंनी मिळवली पदव्यूत्तर पदवी
वृत्तसेवा :- श्रीलंकेच्या केलनिया विद्यापीठात एका आजीबाईंनी नुकताच पराक्रम केला. बुद्धिष्ट स्टडीजमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी वयाच्या 97 वर्षी प्राप्त केली. त्यांचे पूर्ण नाव आहे विठनागे असिलिन धर्मरत्ने. केलनिया विद्यापीठातील सर्वात वयस्कर विद्यार्थी म्हणून या आजीबाईंचे नाव झाले आहे. वयाच्या 94 वर्षी त्या त्रिपिटक धम्म आणि पालीभाषा या सिरीलंकेतील परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. एम. ए. पदवी परीक्षेसाठी त्यांना खालील विषय होते. 
१) Buddhist philosophy in the Pali Canon 
२) Buddhist Arts and Architecture in Sri Lanka 
३) Buddhist Psychiatry 
४) Economics in Buddhist Philosophy 
५) Thervada Tradition History and Dhamma 
६) Buddhist Ethics - Concept and Philosophical Interpretation & Research Methods. 
त्यांचे हे विषय पाहून या वयात त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करावेसे वाटते. नवीन पिढीने त्यांच्यापासून हाच बोध घ्यावा की शिक्षणाला वयाची अट नसते आणि जिद्द बाळगली की अनेक शैक्षणिक शिखरे पार करता येतात. शिक्षणा वाचून आयुष्य व्यर्थ आहे आणि त्यातही बुद्धीस्ट स्टडीजमध्ये जेवढे परिपक्व व्हाल तेवढे आयुष्य सुंदर होत जाईल. मन निर्मळ होईल. आंतरिक ज्ञान प्राप्त होऊन दैनंदिन व्यवहारात ते उतरत जाईल. 

संग्राहक : मिलिंद आशा तानाजी धावारे, लातूर.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज ), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)