अधीर रंजन चौधरींसह विरोधी पक्षाचे 47 खासदार हिवाळी अधिवेशनापर्यंत निलंबित (47 opposition MPs including Adhir Ranjan Chaudhary suspended till winter session)
वृत्तसेवा :- संसदेत झालेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसच गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह 33 खासदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सभागृहासमोर ठेवला आणि तो ध्वनी मताने मंजूर करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर) 11वा दिवस आहे. संसदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी 13 डिसेंबरला संसदेवर झालेल्या स्मोक बॉम्ब अटॅकवर चर्चेची मागणी केली. यानंतर सभागृहात गोंधळाला सुरुवात झाली. यामुळे 33 खासदारांना सोमवारी निलंबित करण्यात आले.
यातील 30 जणांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले, तर जयकुमार, विजय वसंत आणि अब्दुल खालिक यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या तीन खासदारांनी स्पीकरच्या पोडियमवर चढण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. 14 डिसेंबर रोजी देखील संसद हल्ल्यावरुन खासदार आक्रमक झाले होते. डीएमकेच्या खासदारांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून हल्ल्यावर चर्चेची मागणी लावून धरली होती. जोरजोरात घोषणाबाजी केली. त्या दिवशी 14 सदस्यांना निलंबित केले होते. यातील 13 लोकसभेचे आणि एक राजस्यसभा सदस्य होते. या सर्वांना देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. याआधी 14 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये डीएमके सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे. यात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ'ब्रायन यांचाही समावेश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत 47 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या