राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंचे जल्लोशात स्वागत प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाने भारावले खेळाडू, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त आज स्कूटर रॅली खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन Athletes who came for the national sports competition are welcomed with enthusiasm, the athletes are overwhelmed by the excellent planning of the administration, on the occasion of the national school sports competition, the scooter rally appeals to the athletes to participate in the rally to boost their enthusiasm

Vidyanshnewslive
By -
0
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंचे जल्लोशात स्वागत प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाने भारावले खेळाडू, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेनिमित्त आज स्कूटर रॅली खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन Athletes who came for the national sports competition are welcomed with enthusiasm, the athletes are overwhelmed by the excellent planning of the administration, on the occasion of the national school sports competition, the scooter rally appeals to the athletes to participate in the rally to boost their enthusiasm.
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचा ज्वर आता जोमाने चढत असून विविध राज्यांमधून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुर येथे दाखल झालेल्या खेळाडूंचे जिल्हा प्रशासन, क्रीडा संघटना, पदाधिकारी व स्वागत समितीच्या वतीने जल्लोशात स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन आणि स्वागताने क्रीडा स्पर्धेसाठी आलेले खेळाडू भारावून गेले आहेत. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकाराने 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, क्रीडा संघटना व त्यांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आदींचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात स्वागत समिती, निवास समिती, भोजन समिती, उद्घाटन समिती, वाहतूक व्यवस्था समिती आदींचा समावेश आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आजपासून खेळाडू येण्यास सुरवात झाली आहे. चंद्रपुरात खेळाडू घेऊन येणा-या विविध राज्यांच्या प्रतिनिधींशी स्वागत समितीच्या सदस्यांनी सुरवातीपासूनच संपर्क केला असून, त्यांची ट्रेनची येण्याची वेळ लक्षात घेता नियोजन केले आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकावर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी झारखंड, उत्तराखंड, जम्मु काश्मिर, ओडीसा, पंजाब या राज्याातील खेळाडूंचे त्यांच्या प्रशिक्षकांसह चंद्रपूर व बल्लारपूर येथे आगमन झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्व राज्यातील खेळाडू चंद्रपूरात दाखल होतील, असे क्रीडा विभागाने कळविले आहे.
             67 वी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत तालुका क्रीडा संकुल बल्लारपुर येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेनिमित्त जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी 25 डिसेंबर रोजी शहरात स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सदर स्कुटर रॅली 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथून निघणार आहे. जिल्हा स्टेडियम, वरोरा नाका, प्रियदर्शनी चौक, जटपुरा गेट, माता महाकाली मंदिर, बल्लारपूर शहर ब्राह्मणी फाटा असा रॅलीचा मार्ग राहणार असून तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, महानगरपालीकेचे आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तसेच क्रीडा, वन, महसूल आणि इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी व  विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)