६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर व बल्लारपूर नगरीं नववधू सारखी सजली (Chandrapur and Ballarpur cities dressed up like brides on the occasion of 67th National School Field Sports Championship)
चंद्रपूर :- ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील उड्डाणपूलावरील दिव्यांवर तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण झाले आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. 'मिशन ऑलिम्पिक 2036' हे एकच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा मंगळवार, २६ डिसेंबरला बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात सुरू होणार आहे.
रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजकावर सूर्यनमस्कारातील मुद्रा दर्शविणाऱ्या शिल्पाकृती बसविण्यात आल्या आहेत. रंगबेरंगी चित्रांनी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. जणू काही दिवाळी असल्यासारखे चंद्रपूर शहर सजविण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे बल्लारपूर बसस्थानक हे विविध रंगीं रोषणाई ने न्हावून निघालं आहे सोबतच तालुका क्रीडा संकुलला आकर्षक रोषणाई ने सजविले असून बॉटनिकल गार्डन परिसरातील स्वागत गेट पासून तर तालुका क्रीडा संकुल पर्यंत चा परिसर प्रकाशमय करण्यात आला आहे. विविध राज्यातील स्पर्धेकाच्या व प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बल्लारपूर रेल्वे स्थानकवर स्वागत कक्ष उभारण्यात आला असून स्पर्धेचा उदघाट्न सोहळ्याची युद्ध स्तरावर तयारी सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या