बामसेफचे 40 वे राष्ट्रीय अधिवेशन प्रयागराज येथे सुरु, सरकारची भूमिका संविधान विरोधी - राकेश टिकैत (BAMSEF's 40th National Convention Begins at Prayagraj, Govt's Stand Anti-Constitution - Rakesh Tikait)
प्रयागराज :- शेतकरी - शेतमाजुरांसाठी येणारा काळ अतिशय वाईट असेल. सरकार इतर राजकीय पक्षांवर दबाव निर्माण करून त्यांना संपवीत आहे,त्यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संविधानने सरकारवर मार्गदर्शक तत्वाच्या माध्यमातून काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मात्र सरकार संविधान विरोधी भूमिका घेत आहे,असे प्रतिपादन शेतकरी नेते व भारतीय किसान युनियन प्रमुख राकेश टिकैत यांनी केले. दिनांक 24 ते 27 डिसेंबर 2023 ला बामसेफचे 40 वे सुवर्ण जयंती राष्ट्रीय अधिवेशन किसान महाविद्यालय, पटेल नगर,रिवा रोड,प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे आयोजित करण्यात आले.अधिवेशनाच्या उदघाटन सत्रात सन्मानित पाहुणे म्हणून राकेश टिकैत बोलत होते. या अधिवेशनाचे उदघाटन सेवानिवृत्त सनदी अधिकारी आर. आर.फुलिया यांनी केले. अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गणोरकर यांनी केली तर सत्राचे प्रास्तवीक बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डॉ.संजय इंगोले यांनी केले. टिकैत पुढे म्हणाले की,आदिवासी - शेतकरी यांच्या जमिनी सरकार जबरदस्तीने घेऊन अदानी - अंबानी भांडावलदारांना विकत आहे. संविधानिक लढा हा कुठल्या एका वर्ग समूहाचा नाही. तो समस्त मूलनिवासी लोकांचा आहे. जो कोणी सरकार विरोधी आंदोलन करेल त्या आंदोलनाकारी लोकांना आम्ही साथ देऊ अशी भूमिका यावेळी टिकैत यांनी व्यक्त केली.
चार दिवस चालणाऱ्या अधिवेशनात सहा प्रबोधन सत्र,चार प्रतिनिधी सत्र आणि एका समारोपीय सत्राचे आयोजन करण्यात आले.या सत्रांत देशातील मान्यवर अभ्यासक मार्गदर्शन करतील.या अधिवेशनात देशातील 250 जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित आहेत. उदघाटन सत्रात विशेष अतिथी व उदघाटक आर. आर. फुलिया मार्गदर्शन करताना म्हणाले की बुद्धीजीवी वर्गाची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या समाजातील मागासलेल्या बांधवांचा विकास साधण्यासाठी प्रयासरत असावे. बामसेफचे प्रशिक्षित कार्यकर्ते त्या दिशेने कार्य करीत. उदघाटन सत्राची अध्यक्षता करताना बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गणोरकर म्हणाले की बामसेफ आपल्या महापुरुषांचे लक्ष प्राप्तीसाठी कटीबद्ध असलेले देशातील एकमेव संघटन आहे. ब्राह्मणवाद विषमतावादी विचारधारा आहे.हा विचार मुळासकट उपटून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. गणोरकर पुढे म्हणाले की बामसेफने मंडल आयोग लागू व्हावा यासाठी देशभरात आंदोलन केले. तेव्हा अज्ञानमुळे बऱ्याच ओबीसी लोकांनी मंडलला विरोध केला. आज तोच ओबीसी आता आपल्या हक्क अधिकार प्रति जागृत झाला आहे. बामसेफने अनेक मुद्दे समाजाला दिलेत. खाजगीकरण, जाती आधारित जनगणना, शिक्षणाचे खाजगीकरण हे त्यापैकी महत्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांच्या आधारावर अनेक पक्ष - संघटना कार्य करीत आहेत. ही एक सकारात्मक बाब असली तरी या संघटनांनी फुले-आंबेडकर विचारधारा स्वीकारली नाही. उलट ते ब्राह्मणी विचारधारेचे वाहक बनले आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर या लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. या साठी बामसेफ सदैव प्रयास करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या