भाजपच धक्कातंत्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड पाठोपाठ राजस्थानातही नवा मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती ! (After BJP, Madhya Pradesh, Chhattisgarh, Rajasthan also appointed Bhajanlal Sharma as the new Chief Minister and Diya Kumari and Premchand Bairwa as Deputy Chief Ministers!)

Vidyanshnewslive
By -
0
भाजपच धक्कातंत्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड पाठोपाठ राजस्थानातही नवा मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती ! (After BJP, Madhya Pradesh, Chhattisgarh, Rajasthan also appointed Bhajanlal Sharma as the new Chief Minister and Diya Kumari and Premchand Bairwa as Deputy Chief Ministers!)
वृत्तसेवा :- राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली असून, भजन लाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनले असून त्यांचा शपथविधी 15 डिसेम्बर रोजी होणार आहे. छत्तीसगड मध्ये विष्णूदेव साय आणि मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव यांच्या स्वरूपात नव्या मुख्यमंत्र्यानंतर आता राजस्थानमध्येही नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यात आले आहे. भजनलाल शर्मा यांच्याकडे राजस्थानची कमान सोपवण्यात आली आहे. आधीच भाकित केल्याप्रमाणे राजस्थानमध्येही तेच दिसून आले आहे. भरतपूर येथील रहिवासी असलेले भजनलाल शर्मा हे दीर्घकाळापासून संस्थेत कार्यरत आहेत. तसेच ते प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. MLA अशोक लाहोटी यांना तिकीट न देता, भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये CM Bhajan Lal Sharma भजनलाल शर्मा विजयी झाले. पक्ष्याच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष, भजन लाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी जयपूरला पोहोचलेल्या तीन निरीक्षकांसोबत भाजप आमदारांचे फोटो सेशन झाले. फोटो सेशनदरम्यान मुख्य निरीक्षक राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे उपस्थित होते. विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांच्याशी फोनवर चर्चा केली. आमदारांशी बोलूनच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भजन लाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)