विष्णुदेव साय हाेणार छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विश्वसनीय सूत्रांची माहिती (According to reliable sources, Vishnu Dev Sai will be the new Chief Minister of Chhattisgarh)
वृत्तसेवा :- छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठव्या दिवशी मिळालं. राज्य भाजप कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठकी छत्तीसगडचे नवे मुख्यंमत्री म्हणून विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, असे वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे. भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांनी आज (दि.१०) दुपारी रायपूरमध्ये भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक घेतली. छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही या बैठकीला उपस्थित होते. अखेर आदिवासी नेते विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामाेर्तब केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, अर्जुन मुंडा आणि दुष्यंत कुमार गौतम यांच्याशिवाय छत्तीसगड भाजपचे प्रभारी ओम माथूरही उपस्थित होते. केंद्रीय निरीक्षक सकाळी नऊच्या सुमारास रायपूरला पोहोचले. दुपारी 12 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या नावावरून आमदारांसोबत विचारमंथन सुरू झाले. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर अखेर शिक्कामाेर्तब झाले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या