द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण, राजनाथ सिंग आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुड गव्हर्नन्स एक्सलन्स अवॉर्डने सुधीर मुनगंटीवार सन्मानित, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजसेवेच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व्हावे : सुधीर मुनगंटीवार (Distribution of The CSR Journal Excellence Award 2023, Sudhir Mungantiwar honored with Good Governance Excellence Award by Rajnath Singh and Eknath Shinde For excellence in all areas of social service with the help of modern technology: Sudhir Mungantiwar)

Vidyanshnewslive
By -
0
द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण, राजनाथ सिंग आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुड गव्हर्नन्स एक्सलन्स अवॉर्डने सुधीर मुनगंटीवार सन्मानित, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजसेवेच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व्हावे : सुधीर मुनगंटीवार (Distribution of The CSR Journal Excellence Award 2023, Sudhir Mungantiwar honored with Good Governance Excellence Award by Rajnath Singh and Eknath Shinde For excellence in all areas of social service with the help of modern technology: Sudhir Mungantiwar)
मुंबई :- आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समाजसेवेच्या सर्वच क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांनी उत्कृष्ट कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य,  वने, आणि मत्स्यव्यवसाय मंत्री  श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल गुड गव्हर्नन्स एक्सलन्स अवॉर्ड स्वीकारताना स्वीकारताना ते बोलत होते. मुंबईत शनिवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की फार्मर (शेतकरी), फिशरीज (मत्स्य व्यवसाय),  आणि फॉरेस्ट (वने) हे फॅमिलीचे (कुटुंबाचे)  मोठे आधारस्तंभ आहेत.  याच तीन एफ मधून फॅमिली म्हणजे कुटुंबाला अन्न पाणी,  वनौषधी,  शुद्ध हवा मिळते.  त्यामुळे या तीनही क्षेत्रांचे योग्य व उत्कृष्ट संवर्धन करणे गे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही त्याकरताच प्रयत्नरत आहोत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रत्येकाने यात आपले योगदीन अवश्य द्यावे. कॉर्पोरेट क्षेत्राने सीएसआरच्या माध्यमातून या क्षेत्रात आपले योगदान वाढवावे असेही ते म्हणाले.कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे.  जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही  देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी मदत  करतो तेव्हा अनेक व्यक्ती,  समाज  आपल्याशी  जोडला जातो. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.केंद्रीय मंत्री श्री. सिंह  म्हणाले, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. परस्पर अवलंबिताची बंधने तोडून राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अडचणीवेळी मदत केली तर मदत करणाऱ्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे हे पहिले जात नाही. तर कोणत्या व्यक्तीने तातडीने मदत केली हेच पाहिले जाते. समाजात बंधुत्वाची,आणि मदतीची भावना असायला हवी. जो समाज एकमेकांना मदत करतो तोच समाज देशाला पुढे घेऊन जातो आणि  इतरांना पुढे येण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो.त्यासाठी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचे, विशेषत: कॉर्पोरेट्स क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सामजिक योगदानाबद्दल कौतुकच केले पाहिजे.असेही केंद्रीय मंत्री श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.सामाजिक विकासासाठी  उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या  संस्थाचे महत्वापूर्ण योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दुसऱ्याला मदत करणे ही आपली परंपरा आहे. दान धर्म ही आपली संस्कृती आहे. समाजासाठी काम करणे हे आपले कर्तव्य व उत्तरदायित्व आहे. सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक संस्था आणि कंपन्या शासनासमवेत काम करीत आहेत. उत्तरदायित्व सांभाळणाऱ्या  संस्थाचे सामाजिक विकासामध्ये महत्वापूर्ण योगदान ही अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
        मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,  समाज, देश आणि राष्ट्राला प्राधान्य देत  देशात मोठ्या प्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि कंपन्या आहेत. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री श्री एकनीथ शिंदे यांनी श्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कौतुक केले. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य,  वने, आणि मत्स्यव्यवसाय या तीनही क्षेत्रात विविध योजना राबवून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. लंडन येथील छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा सामंजस्य करार केला. ५० कोटी झाडांची लागवड करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना आज गुड गव्हर्नन्स एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्कारानी सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची वेगळीओळख निर्माण केली आहे त्यांना एंबेसडर फॉर सोशल इम्पॅक्ट हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मला वडील म्हणून अभिमान आहे. असे सांगून दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी सामजिक कार्य करणारे  पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे  यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले,  त्याबद्दल त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कॉर्पोरेर्ट कंपन्यांचा सन्मान कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्कृष्ट व वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कार्यांसाठी सीएसआर निधी वितरित करणाऱ्या विविध कॉर्पोरेट कंपन्यांना सन्मानित करण्यात आले  दी सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ ने सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवर व्यक्तींमधे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर, माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. भास्कर चटर्जी, आयकर आयुक्त विकास अग्रवाल, सहआयुक्त निधी चौधरी, सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, माजी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस सहारिया, माजी सनदी अधिकारी दीपक सानन,माजी सनदी अधिकारी  अजितकुमार जैन, एबीपी माझा मुख्य संपादक राजीव खांडेकर, आयकर विभागाचे आयुक्त सुमित कुमार, एनआरएलएम मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रधान मुख्य आयकर आयुक्त रीना झा त्रिपाठी, माजी सनदी अधिकारी डॉ. प्रदीप व्यास, टाटा सामाजिक विज्ञान संस्थांचे प्र-कुलगुरू बिना पॉल, इरा खान,सुहानी शहा यांचा समावेश होता.  तसेच मुख्यमंत्री  आणि  केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते दुर्गम भागात आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या सामजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे  यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी अभिनेता अमीर खान, सुहानी शहा विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते. कार्याचा गौरव यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध खात्यांमधील कार्याचा आणि नवीन उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)