जागतीक दिव्यांग दिनानिमीत्य दिव्यांगांना साहित्य साधनाचे वाटप (Distribution of materials to disabled people on the occasion of World Day of Disabled Persons)

Vidyanshnewslive
By -
0
जागतीक दिव्यांग दिनानिमीत्य दिव्यांगांना साहित्य साधनाचे वाटप (Distribution of materials to disabled people on the occasion of World Day of Disabled Persons)
बल्लारपूर :- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सर्वसमावेशक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (MPTRC) समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत अंगणवाडी ते 12 वी पर्यत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग मुला-मुलीचे अलिम्को संस्था जबलपूर मध्य प्रदेश मार्फत मोजमाप शिबिराचे आयोजन करून ३८१ विद्यार्थ्यांची साहित्य साधन करिता निश्चिती करण्यात आले. ज्यामध्ये व्हिलचेअर १३४, ट्रायसिकल 12 , सीपी चेअर ३०, रोलेटर ५६, श्रवणयंत्र ८४ असे साहित्य अलिम्को संस्था जबलपूर कडून प्राप्त झाले. जागतिक दिव्यांग सप्ताह ३ ते ९ डिसेंबर चे औचित्य साधून दिनांक 5 डिसेंबर रोजी  मा.राजकुमार हिवारे शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद चंद्रपूर  यांचे हस्ते समग्र शिक्षा येथे चंद्रपूर तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांना व्हिलचेअर, सीपी चेअर, रोलेटर साहित्य वितरित करण्यात आले. व उर्वरित सर्व साहित्य १५ तालुक्यात वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजन गणेश राखडे, फकिरा राठोड, अभय वनवे जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा जिल्हा परिषद यांनी केले. या वेळी कु.सुनिता कुशवाह,  रत्नाकर निब्रड (समावेशित तज्ञ ),  कु. प्रतिभा  आष्टणकर, श्री  हावरे,  पिपळशेट्टीवार, बनसोड, नागदेवते (विशेष शिक्षक) उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)