पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी पुरोगामी साहित्य संमेलनात होणार पुरस्कार वितरण. (Progressive Journalist Sangh state level award announced Award distribution will be held on 24 February 2024 at Purogami Sahitya Sammelan.)

Vidyanshnewslive
By -
0
पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी पुरोगामी साहित्य संमेलनात होणार पुरस्कार वितरण. (Progressive Journalist Sangh state level award announced Award distribution will be held on 24 February 2024 at Purogami Sahitya Sammelan.)
चंद्रपूर -: राष्ट्रीय पुरोगामी पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, केंद्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी राज्य अध्यक्ष संतोष जाधव, राज्य सचिव निलेश ठाकरे, राज्य कार्याध्यक्ष गोपाल लाड,राज्य कार्यकारणी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुरस्कारांना मान्यता दिली आहे.
    १) राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य गौरव पुरस्कार  लेखक पवन भगत यांच्या  'ते पन्नास दिवस' या कादंबरीला जाहीर करण्यात आला असून ही कादंबरी कोरोना काळातील लॉक डाऊन नंतर हजारो किमी पायदळ प्रवास करणाऱ्या मजुरांची विदारक कथा आहे.ही कादंबरी अनेक प्रादेशिक भाषेत प्रकाशित झाली आहे.तथा अनेक पुरस्कार या कादंबरीला प्राप्त झाले आहे. २) राज्यस्तरीय डॉ.आंबेडकर पत्रकारिता गौरव पुरस्कार रतनकुमार साळवे, संभाजी नगर, यांना जाहीर करण्यात आला आहे. निळे प्रतिक या सप्ताहिकातून सात्यत्याने पुरोगामी विचारांचा वारसा ते चालवत आहे. ३) राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार  निता चापले मुंबई, यांना जाहीर करण्यात आला असून, त्या माजी राष्ट्रीय महिला क्रिकेट खेळाडू, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्ता आहेत. ४) राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्री फुले शिक्षक गौरव पुरस्कार विजय भसारकर (मुख्याध्यापक) अंध, मूकबधिर विद्यालय, आनंदवन, वरोरा यांना जाहीर करण्यात आला आहे.अंध,मूकबधिर विद्यार्थ्यांच्या भावना मायेने समजून घेऊन त्यांना ते शिक्षण देतात. ५) राज्यस्तरीय 'फातिमा शेख शिक्षण गौरव पुरस्कार' रजिया हेमंत मानकर बल्लारपूर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी शून्यातून विश्वनिर्मिती करून माफक फी मध्ये शिक्षण देणारी इंग्रजी शाळेची निर्मिती केली आहे. ६) राज्यस्तरीय 'शहिद भगत सिंग साहित्य गौरव पुरस्कार' श्रुंखल भोयर, नागपूर यांना जाहीर करण्यात आला आहे.वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याचा 'दी स्टडीली चेंज' नावाचा इंग्रजी काव्य संग्रह प्रसिद्ध झाला आहे. ७) राज्यस्तरीय 'युवा कला गौरव पुरस्कार' कु.स्नेहल सुनील सिरसाट अकोला, हिला जाहीर करण्यात आला असून, ती बालपणा पासून महापुरुषांचे विचार आपल्या गोड आवाजात समाजात पेरण्याचे काम करीत आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या औद्योगिक नगरीत होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलनात होणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना पुरोगामी पत्रकार संघ, पुरोगामी साहित्य संसद महाराष्ट्र च्या सर्व पदाधिकारीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)