भन्ते प्रज्ञापाल महाथेरो यांनी लावलेली धम्माची ज्योत सतत तेवत ठेवावी - भन्ते डॉ धम्मसेवक महाथेरो (The flame of Dhamma lit by Bhante Prajnapala Mahathero should be kept burning - Bhante Dr Dhammasevak Mahathero )

Vidyanshnewslive
By -
0
भन्ते प्रज्ञापाल महाथेरो यांनी लावलेली धम्माची ज्योत सतत तेवत ठेवावी - भन्ते डॉ धम्मसेवक महाथेरो (The flame of Dhamma lit by Bhante Prajnapala Mahathero should be kept burning - Bhante Dr Dhammasevak Mahathero )
बल्लारपूर : भिक्षु निवास पाली विद्यालय बुध्द विहार, विद्यानगर बल्लारपुर येथे स्मृतिशेष भन्ते प्रज्ञापाल महाथेरो यांच्या स्मृती दिनानिमित्य विहारासमोरील पटांगणात बोलतांना वरील उदगार काढले. भन्तेनी बल्लारपूर नगरीत बौद्ध धम्माची ज्योत पेटवली व संपूर्ण बल्लारपूर शहरात धम्ममय वातावरण निर्मितीत सिहांचा वाटा होता. सुरुवातिला भन्तेनी त्रिशरण पंचशील दिले आणि बुध्दपुजा, त्रिरत्न वंदना, सुत्ताचे पठण करण्यात आले. भन्ते बोधीपालो खंती यांचेही सूंदर मार्गदर्शन झाले. भन्ते आनंद, श्रामनेर सागरबोधी, समितीचे संचालक ताराचंद थुल, प्रल्हादजी खैरे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नंदाताई मून, प्रास्ताविक रसिकाताई वाघमारे तर सर्वांचे आभार निताताई कोरडे यांनी मानले. धम्ममित्र भास्कर भगत यांनी भन्तेच्या जीवनावर सुंदर गीत सादर केले. बाल धम्मवर्गातील हृदया रामटेके यांनी मराठीतून पंचशील तर विधायक पंचशील जीविका दारुंडे सर्व जनतेला दिले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)