केळझर येथील मालधक्याच्या विरोधात गावकऱ्यांनी केले उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करु - राजु झोडे (Villagers led Ulgulan organization to protest against Maldhaka in Kelzar, protest strongly if demands are not met - Raju Zode)

Vidyanshnewslive
By -
0

केळझर येथील मालधक्याच्या विरोधात गावकऱ्यांनी केले उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करु - राजु झोडे (Villagers led Ulgulan organization to protest against Maldhaka in Kelzar, protest strongly if demands are not met - Raju Zode)

चंद्रपूर :- केळझर येथील मालधक्याच्या विरोधात गावकऱ्यांनी आज मंगळवारी उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले असून सुरजागड कंपनी व लोयड्स मेटल्स कंपनी तसेच स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न देखील केला. त्यांनतर मूल पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेत सुटका केली.मात्र जोपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार व लोयड्स मेटल्स चे कर्मचारी यांनी लवकरच गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करू तसेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सुरजागड येथील लोह प्रकल्पातील आयरन मोठ्या प्रमाणात केळझर येथे ट्रकच्या माध्यमातून आणल्या जात आहे. हे ट्रक गावच्या मधोमध चालत असून रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे.तर दिवसरात्र जड वाहतूक होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.केळझर येथे रेल्वेस्टेशन लगत व परिसरात अनेक नागरिकांच्या शेती आहेत. परिणामी ट्रकच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. इतकेच नव्हे तर अनेक नागरिकांना विविध आजारांची लागण सुद्धा झाली आहे. या सर्व समस्या मागील अनेक दिवसांपासून शासन दरबारी मांडल्या गेल्या. मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.परिणामी समस्या जैसे थे च असून शासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी गावकऱ्यांना सोबत घेऊन केळझर गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी गावकऱ्यांचा रोष बघता मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतले. त्यामुळं काही काळ तणावाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले होते. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाने गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, प्रदूषण, शिक्षण, शेत पिंक नुकसान भरपाई व अन्य समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले त्यानंतर राजू झोडे यांनी निवेदन देत आंदोलन मागे घेतले.मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, सरपंच पुनम रामटेके, सुभाष रणदिवे, श्रीकांत घोनमोडे, श्याम झिलपे, मनोज कोडापे, कैलाश घडसे, राजु लोणबले, डेविड खोब्रागडे, निलेश मानकर, सरोज खोब्रागडे, सुरेश फुलझले, पंचशील तामगाडगे आदि गावकरी उपस्थित होते. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)