बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन Call for contact for identification of unidentified dead person at Ballarshah railway station

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन Call for contact for identification of unidentified dead person at Ballarshah railway station

चंद्रपूर :- रेल्वे स्टेशन, बल्लारपूर येथील बुकिंग ऑफिस जवळ दि.7 ऑक्टोबर रोजी एक अनोळखी पुरुष मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळून आले आहे. असे ऑनड्युटी स्टेशन उपप्रबंधक रेल्वे स्टेशन, बल्लारपूर यांनी कळवले आहे. याबाबत रेल्वे पोलीस चौकी, बल्लारपूर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनोळखी मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे सदर व्यक्तीचे वय 60 वर्ष असून उंची 5 फुट 2 इंच, सडपातळ बांधा, केस टक्कल पडले असून सभोवतालचे केस पांढरे वाढलेले, चेहरा लांबट, रंग निमगोरा, नाक सरळ लांबट, मिशी वाढलेली काळी पांढरी, उजव्या हातावर काळ्या रंगाचा रबर घातलेला आहे तसेच अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व गर्द निळ्या रंगाचा लोअर फुलपॅन्ट परीधान केला आहे. या वर्णनावरून सदर मृतक अनोळखी व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर रेल्वे पोलीस स्टेशन, वर्धा येथे 7499967957 आणि तपासी अंमलदार प्रदीप सायरे यांच्या 8888508434 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)