बल्लारपूर नगर परिषदेद्वारे 'माझी वसुंधरा अभियान 4' अंतर्गत गणेश स्पर्धा पुरस्कार सोहळा संपन्न (Ganesh competition award ceremony under 'Mazi Vasundhara Abhiyaan 4' concluded by Ballarpur Nagar Parishad)

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर नगर परिषदेद्वारे 'माझी वसुंधरा अभियान 4' अंतर्गत गणेश स्पर्धा पुरस्कार सोहळा संपन्न (Ganesh competition award ceremony under 'Mazi Vasundhara Abhiyaan 4' concluded by Ballarpur Nagar Parishad)

बल्लारपूर :- नगरपरिषद बल्लारपुरद्वारे माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत "पर्यावरण पूरक उत्कृष्ठ सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणेश स्पर्धा पुरस्कार सोहळा" दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी गोंडराजे बल्लाळशाह नाट्यगृहात संध्याकाळी ४ वाजता नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात निमंत्रक म्हणून श्री. विशाल वाघ (मुख्याधिकारी तथा प्रशासक, नप बल्लारपुर) आणि प्रमुख अतिथि म्हणून मा.श्री.चंदनसिंह चंदेल (माजी अध्यक्ष, वन विभाग महामंडळ, महाराष्ट्र राज्य), मा. श्री.घनश्याम मुलचंदानी (माजी नगराध्यक्ष), मा.श्री.दिलीप माकोडे (माजी नगराध्यक्ष), मा.श्रीमती छाया मडावी (माजी नगराध्यक्ष) तसेच उपजिल्हाधिकारी श्री.रंजीत यादव हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वानी पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली व त्यानंतर श्री गणेशाच्या मूर्तीसमोर दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदर स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश हा शहरातील गणेशोस्तव साजरा करण्यात नैसर्गिक संसाधनाचा वापर करण्यास उत्तेजन देणे व अनैसर्गिक घटक जसे थेरमोकोल, प्लॅस्टिक यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे हा होता. या ध्येयाच्या आधारे स्पर्धेचे निकष ठरवीत मुख्याधिकारी यांनी नेमलेल्या पथकामार्फत शहरातील गणेश मंडळे व घरगुती गणेश यांची पाहणी करण्यात आली व ठरलेल्या निकषांच्या आधारे गुणांकण देण्यात आले. सदर पथकात नगरपरिषदेतील श्री.दिपक पंडित (अंतर्गत लेखापरीक्षक), श्री.प्रशांत गणवीर (पाणीपुरवठा अभियंता), श्रीमती रीना बहोत (लिपिक), श्री.मंगेश सोनटक्के (शहर समन्वयक) व श्री.श्याम परसुटकर (प्र.लिपिक) यांचा समावेश होता. सदर पथकाद्वारे ठरलेल्या निकषांच्या आधारे गुणांकन देण्यात आले. 

              सार्वजनिक गणेश मंडळात प्रथम पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम रु.२१००० हे श्री बाळ गणेश मंडळ (टेकडीचा राजा, महाराणा प्रतापवॉर्ड), द्वितीय परितोषिक रोख रक्कम रु.१५००० हे सिद्धिविनायक गणेश मंडळ (सुभाष वॉर्ड) व तृतीय पारितोषिक रु.११००० हे श्री.बाळगणेश सार्वजनिक मंडळ (साईबाबा वॉर्ड) यांस तर घरगुती गणेश मंडळात प्रथम पारितोषिक रु.५००० हे श्री.साहिल माणूसमारे, द्वितीय पारितोषिक रु.३००० हे  चैतन्य घनश्याम बुरडकर व तृतीय पारितोषिक हे रु.२००० हे  श्रीनिवास उसकलवार यांस देण्यात आले. प्रथम ३ क्रमांकास रोख रकमेसह प्रमाणपत्र व मोमेंटो देण्यात आले व इतर सहभागी सर्व स्पर्धकांस प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून याच वर्षीच्या केंद्र शासनाच्या स्वच्छ उत्सव २०२३ अभियान अंतर्गत स्वच्छता प्रतिज्ञा उपक्रमात यावेळी बल्लारपुर शहरातील नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेऊन एकूण ६७५६१ प्रतिज्ञा नोंदवीत बल्लारपुर शहराला महाराष्ट्रात सहाव्या व देशात नवव्या क्रमांकाचे स्थान मिळवून दिल्याचा आनंद व्यक्त करत सदर अभियान राबविण्यात सहभागी टीमचे ज्यामध्ये श्री.दिपक पंडित (अंतर्गत लेखापरीक्षक), श्रीमती रीना बहोत (लिपिक), श्री.मंगेश सोनटक्के (शहर समन्वयक) तसेच मनोज, सुनीता व प्रणाली हे डेटा ऑपरेटर यांना प्रोत्साहन देत मंचावर उपस्थित मान्यवऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सदर स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांत पर्यावरण पूरक गणेशोस्तव साजरा करण्याबाबत जागृती निर्माण होऊन भविष्यातील प्रत्येक गणेशोस्तव हा निसर्गास कोणतीही हानी पोहोचवणार नाही अशी आशा कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक तथा मुख्याधिकारी श्री.विशाल वाघ यांनी व्यक्त केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)