पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर, पाचही राज्यात आदर्श आचार संहिता लागू, 3 डिसेम्बर ला पाचही राज्याचा निकाल (Assembly elections of five states announced, model code of conduct implemented in all five states, results of all five states on December 3)

Vidyanshnewslive
By -
0

नवी दिल्ली :- पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आलीये. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगानात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल हे पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)