महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात, विविधते मध्ये एकतेचे प्रदर्शन करून साजरा 'केला 'हिंदी दिवस' (Mahatma Jyotiba Phule College celebrated 'Hindi Day' by demonstrating unity in diversity)

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात, विविधते मध्ये एकतेचे प्रदर्शन करून साजरा 'केला 'हिंदी दिवस' (Mahatma Jyotiba Phule College celebrated 'Hindi Day' by demonstrating unity in diversity)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फूले महाविद्यालय, बल्लारपूर येथे आज 14 सप्टेंबर हिंदी दिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशातील विविध राज्यातील भाषा व संस्कृति वेगळी असूनही हिंदी भाषा ही कशी एकसूत्रात बांधून ठेवते याचे प्रदर्शन नाटकाच्या माध्यमातून केले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ पल्लवी बोरकर/जुनघरे यांच्या संकल्पनेतून याचे सादरीकरण करण्यात आले. विविध भाषा जरी देशात वापरल्या जात असल्या तरी हिंदी भाषा ही सर्वांना एकसूत्रात जोडणारी आहे असे मत त्यांची विषद केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ बादलशाह चव्हाण सर यांनी कवितेच्या माध्यमातून हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथीं म्हणून प्रा. सविता पवार मॅडम यांनी मनोगत व्यक्त करतांना हिंदी भाषेविषयी माहिती दिली. यावेळी ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. पंकज कावरे यांच्या प्रयत्नातून हिंदी विषयाच्या साहित्य व ग्रंथाची भव्य प्रदर्शनी आयोजित केली. कार्यक्रमाचे संचालन कु अलिना सय्यद व आभार प्रदर्शन स्नेहा गौर यांनी केले. नाट्यकलाकृती अनम शेख, आसमा शेख व स्वाती चौहान यांनी सादर केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)