महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाला एनसीसी कर्नल समित घोष यांची सदिच्छा भेट, एनसीसी केवळ चारित्र्य घडवत नाही तर देशासाठी चांगले नागरिकही घडवते. - कर्नल समित घोष Goodwill visit of NCC Colonel Samit Ghosh to Mahatma Jyotiba Phule College NCC not only builds character but also builds good citizens for the country. - Colonel Samit Ghosh

Vidyanshnewslive
By -
0

बल्लारपूर : 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धाचे कर्नल समीत घोष यांनी स्थानिक महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयास भेट दिली. कमांडिंग ऑफिसरचे महाविद्यालयात आगमन होताच प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांनी कमांडिंग ऑफिसर कर्नल घोष यांचे महाविद्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजयभाऊ कायरकर यांनी कर्नल घोष यांचा सत्कार केला. सन्मानाचे पदक आणि महाविद्यालयाची एनसीसी कॅप. या भेटीदरम्यान महाविद्यालयातील कॅडेट्सना संबोधित करताना कर्नल घोष म्हणाले की, एनसीसी कॅडेट्समध्ये चारित्र्य निर्माण करण्याचे काम करते. एनसीसी केवळ तरुण सैनिकांना भारतीय लष्करासाठी तयार करत नाही तर देशभक्तीची भावना विकसित करून समाजात नवउद्योजक आणि चांगले नागरिक तयार करते. या भेटीदरम्यान कमांडिंग ऑफिसर कर्नल घोष यांनी कॉलेज, एनसीसी मैदान आणि एनसीसी कार्यालयात उपलब्ध असलेल्या एनसीसी सुविधांचा आढावा घेतला. महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे यांनी एनसीसी कार्यालयात त्यांचे फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले. एनसीसीची परंपरा कायम ठेवत बीएसएफमध्ये निवड झालेल्या एनसीसी कॅडेट प्रियांका वर्मा हिचे कमांडिंग ऑफिसर कर्नल घोष यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कमांडिंग ऑफिसरची ही भेट यशस्वी करण्यासाठी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट योगेश टेकाडे आणि एनसीसी कॅडेट्स यांनी अथक परिश्रम घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज) मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)