अबब जिल्ह्यात अशीही एक अफलातून बँक जी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालविली जाते There is also an Aftaloon bank in district which is run by students for students

Vidyanshnewslive
By -
0

अबब जिल्ह्यात अशीही एक अफलातून बँक जी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालविली जाते There is also an Aftaloon bank in district which is run by students for students

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा विविधतेने नटलेला असून ऐतिहासिक स्मारकासह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व वन वैभवाने नटलेला असून महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर असलेल्या या जिल्ह्याने राज्यात एक नवी ओळख निर्माण केली आहे. जिथे शाळांचं खाजगीकरणं होत असतांना व मराठी शाळा ओस पडत असतांना चंद्रपूर जिल्ह्यात अशी एक शाळा व त्यातील अशी एक अफलातून बँक जी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांकरिता चालविली जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील दादापुर या गावात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः करिता अफलातून अशी बँक उभारली जिथे व्यवस्थापक, रोखपाल व लिपिक सारख्या भूमिका या विद्यार्थीच पार पाडतात ही बँक दर बुधवार व शनिवारला सुरु असल्याची  माहिती आहे. 

       विशेष म्हणजे या बँकेची स्थापना शाळेचे मुख्याध्यापक श्री निमजे सर व श्री हजारे सर यांच्या संकल्पनेतून फरवरी 2020 मध्ये झाली मात्र कोरोना संक्रमणाचा काळानंतर या बँकेने ओघ पकडला या बँकेत 1 ली ते 4 थी पर्यंतच्या जवळपास 46 विद्यार्थ्यांचे बँक खाते असून सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जवळपास 46,000/- रु जमा आहेत सदर बँकेच्या दैनंदिन व्यवहारची माहिती व हिशोब विद्यार्थी मुख्याध्यापकांना सादर करतात. विशेष म्हणजे विद्यार्थी शैक्षणिक साहित्य पेन्सिल नोटबुक, शाळेतूनच घेत असतात. यातून विद्यार्थी हा स्वावलंबी व व्यावहारिक विद्यार्थी घडविण्याचा उपक्रम  दादापुर येथील शाळा करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)