महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या सविता पवार मॅडम निवृत्त, महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन Mahatma Jyotiba Phule College Savita Pawar Madam Retired, organized a farewell function on behalf of the college

Vidyanshnewslive
By -
0

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या सविता पवार मॅडम निवृत्त, महाविद्यालयाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन Mahatma Jyotiba Phule College Savita Pawar Madam Retired, organized a farewell function on behalf of the college

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात मागील 12 वर्षांपासून कार्यरत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण करून निवृत्तीच्या पाऊलावर वाट टाकणाऱ्या विद्यार्थांच्या पवार मॅडम आज निवृत्त झाल्या 12 वर्षापूर्बी सप्टेंबर 2011 मध्ये महाविद्यालयात रुजू झालेल्या पवार मॅडम अविरत सेवा देऊन आज निवृत्त झाल्या त्या निमित्ताने आज महाविद्यालयाच्या वतीने आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्रा. लेनगुरे सर, सौ. सविता पवार मॅडम, सुनिल पवार सर, सेवानिवृत्त अभियंता, नगर परिषद बल्लारपूर यांची विचारपिठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवराच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 



             तदनंतर ललित गेडाम सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर प्रा. डॉ. किशोर चौरे, प्रा. डॉ. विनय कवाडे, प्रा. डॉ, पल्लवी जुनघरे, प्रा. शुभांगी भेंडे(शर्मा), प्रा.ले. योगेश टेकाडे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून प्रकाश मेश्राम, प्रा. लेनगुरे सर, प्रा. कृष्णा लाभे इ मान्यवरांनी सविता पवार मॅडम च्या व्यक्तिमत्व  तसेच विविध पैलू वर प्रकाश टाकला यानंतर सविता पवार मॅडम यांनी सत्काराला उत्तर देतांना विविध आठवणींना उजाळा दिला आपल्या सेवेत कार्यरत असतांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आपल्याला वेळीवेळी मौलाची  मदत केली त्यामुळं त्यांनी सर्वांचं विशेष आभार मानले यावेळी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांनी अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करताना पवार मॅडम यांना भविष्यातील वाटचाली साठी सदिच्छा दिल्या कार्यक्रमाचं संचालन प्रा. मोहितकर सर तर आभार प्रदर्शन प्रा. दुरशेट्टीवार मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व पवार कुटुंबीय व आप्तस्वकीय उपस्थित होते. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)