1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास, गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय From October 1, patients admitted to the District General Hospital and their relatives will get a pass, the decision of the hospital administration to avoid overcrowding

Vidyanshnewslive
By -
0

1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास, गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय From October 1, patients admitted to the District GeneralY Hospital and their relatives will get a pass, the decision of the hospital administration to avoid overcrowding

चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय),चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होतांना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यादृष्टीने दि. 1 ऑक्टोबर 2023 पासून रुग्णालयात रुग्णास दाखल करतांना संबंधित रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकास पास वितरित करण्यात येणार आहे. या पासच्या आधारे रुग्णांच्या नातेवाईकास रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच रुग्णास भेटण्याची व रुग्णासोबत थांबण्याची परवानगी देखील देण्यात येणार आहे. विनाकारण रुग्णालयामध्ये गर्दी होऊ नये, याकरीता नागरीकांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)