नगर परिषद बल्लारपुर च्या शाळांतील विद्यार्थ्याकरीता ३ D ग्रहगृह शो चे आयोजन (Organized 3D planetarium show for school students of Ballarpur Nagar Parishad)

Vidyanshnewslive
By -
0

नगर परिषद बल्लारपुर च्या शाळांतील विद्यार्थ्याकरीता ३ D ग्रहगृह शो चे आयोजन (Organized 3D planetarium show for school students of Ballarpur Nagar Parishad)

बल्लारपूर :- भारताच्या चंद्रयान ३ D व सूर्य मोहिमांनी मुलामध्ये खगोलशास्त्राविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या उत्सुकतेचा पाठपुरावा करण्यासाठी नगर परिषद बल्लारपुर द्वारा पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या अगदी नर्सरी पासुन तर इयता १० वी च्या मुलांकरीता दिनांक ६ सप्टेंबर ला गोंडवाना नाट्यगृह बल्लारपुर येथे सकाळी ८.०० वाजे पासून तर दुपारी २.०० वाजेपर्यत ३ D ग्रहगृह शो चे आयोजन करण्यात येत आहे. ह्या शो च्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यामध्ये असलेली खगोल शास्त्राविषयी उत्सुकतेला आणि जिज्ञासेला त्यांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची माहिती मिळणार आहे. त्यांना सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, आणि इतर खगोलीय पिंडाबद्दल शिकण्याची संधी मिळेल. तसेच या प्रेरणेत्तर इव्हेंटमुळे बल्लारपुर नगर परिषद च्या शाळेत शिकणाऱ्या अनेक गोर गरिब पालकांच्या मुलांना अंतरिक्षच्या क्षेत्रातील अदभुत रहस्यमय विश्वाची माहिती त्यास करण्याची संधी मिळणार आहे. या ३ D प्लॅनेटोरियम शोच्या माध्यमातुन आपल्या मुलांना विज्ञान, खगोलशास्त्र इ. विषयी आवड निर्माण होईल. नगर परिषद बल्लारपुर चे मुख्य अधिकारी श्री. विशाल वाघ यांनी सांगितले की हा शो मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तीगत विकासाची तसेच अंतरिक्षाविषयी अनाकलीय प्रश्नांना कुतुहल निर्माण करणारा व लहान मुलांमध्ये उत्सुकता व जिज्ञासा निर्माण करणारा आहे. हे त्यांना खगोल शास्त्राविषयी अधिक माहिती घेण्यास आणि विज्ञान तंत्रज्ञान व संशोधनाबद्दल उत्साह निर्माण करण्यास मदत होईल. तसेच ह्या शो चे जास्तीत जास्त पालंकानी आपल्या पाल्यांना मोफत संधी उपलब्ध करुन द्यावी असे आव्हान मुख्याधिकारी साहेबानी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)