चंद्रपुरातील चित्रपट कलावंतांचा साहित्यिकांच्या उपस्थितीत सत्कार ! (Film artists of Chandrapur felicitated in the presence of literary people !)
चंद्रपूर :- बेरा", आणि "तुझ्यात मी" या चित्रपटात मुख्य भूमिका करून नावारूपास आलेले चंद्रपूर चे अभिनेता शक्तिवीर धीराल आणि चित्रपट कलावंताचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न झाला. चंद्रपूर शहरातील मृणालगिरी सेलिब्रेशन बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे चौक या परिसरात दिनांक 03 सप्टेंबरला सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशक भाऊ खोब्रागडे होते. तर प्रमुख अतिथी सिने निर्माते प्रकाश पाटील मारकवार व प्रमुख उपस्थिती साहित्यिक प्रा. डॉ. इसादास भडके, कामगार नेते मिलिंदजी गवई, मुन्ना खोब्रागडे, आणि प्रमुख आकर्षण सत्कार मूर्ती अभिनेते शक्तिवीर धीराल होते. सर्व पाहुण्यांनि चंद्रपूर च्या कलावंतांनी चंद्रपूर चे नाव रोशन केल्यामुळे त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जेस डेजा यांनी व धीराल यांचा परिचय डॉ. विजय निरंजणे यांनी करून दिला. तर कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे यांनी व आभार प्रदर्शन गोपी मित्रा यांनी मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या