चंद्रपूर शहरात अनियंत्रित वाहतुकीचे 2 बळी, दोन वेगवेगळ्या अपघातात 2 मृत्यू तर 1 जखमी (2 victims of uncontrolled traffic in Chandrapur city, 2 dead and 1 injured in two separate accidents)

Vidyanshnewslive
By -
0

चंद्रपूर शहरात अनियंत्रित वाहतुकीचे 2 बळी, दोन वेगवेगळ्या अपघातात 2 मृत्यू तर 1 जखमी (2 victims of uncontrolled traffic in Chandrapur city, 2 dead and 1 injured in two separate accidents)

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर आज 2 वेगवेगळ्या अपघाताताने हादरून गेले या दोन्ही अपघातात दोन निष्पाप जीवांचा बळी गेला यासंदर्भातील अधिक माहितीनुसार आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान जगन्नाथ बाबा नगरातील रहिवासी असलेल्या व जिल्हा परिषद लखमापूर शाळेत शिक्षिका असलेल्या सौ अनिता ठाकरे यांचा रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ट्रकने दुचाकीस धडक दिली या धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा अपघात चंद्रपूर शहरातील आदर्श पेट्रोल पंप जवळ सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान दुचाकी स्लीप झाल्यामुळं एका युवकाचा नाहक बळी गेला. या संदर्भातील माहितीनुसार MH34-BA9595 ही दुचाकी वरून 2 युवक बंगाली कॅम्प कडून चंद्रपूर शहराकडे येत असतांना वेगात असलेल्या दुचाकी स्लिप झाल्यामुळं एक युवक रस्त्यावर घासत गेला त्यामुळं त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाला. एकूणच शहरात होत असलेली अनियंत्रित वाहतुकीचे 2 निष्पाप बळी गेले असल्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांचे घोळके भरधाव वेगात वाहन चालविताना दिसून येते. शिवाय अनियंत्रित वाहतुकीमुळे निष्पाप नागरिकांचा जीव जातो त्यामुळं अनियंत्रीत वाहतुकीवर नियंत्रण प्रस्थापित झाले पाहिजे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)