अखेर 40 तासाच्या नंतर मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Finally, after 40 hours, the body of the dead woman was cremated.)

Vidyanshnewslive
By -
0

अखेर 40 तासाच्या नंतर मृत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Finally, after 40 hours, the body of the dead woman was cremated.)

चंद्रपूर :- असं म्हणतात शासनाचं काम 12 महिने थांब जिवन्त व्यक्तींना तर त्रास सहन करावा लागतो मात्र व्यक्तीच्या मृत्यू नंतरही एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहाला ही यातना सहन कराव्या लागल्यात तर असाच काहीसा प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील एका गावात घडला गावात एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला. गावातीलच अतिक्रमण असलेल्या जागेवर अंत्यसंस्कार करण्याची मागणी मृत वृद्धेच्या कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली. प्रशासनाने संमती दिली, परंतु गायरान जागेवरील अतिक्रमण धारकाने पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करीत कडाडून विरोध केला. घटनेची माहिती अशी की, कोरपना तालुक्यातील नवेगाव येथे सरस्वती लक्ष्मण कातकर या वृध्द महिलेचे गुरूवारी ( दि. ७) सायंकाळी निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने कुटुंबियांनी तहसीलदाराकडे अंत्यसंस्कार करण्याकरीता गावातील गायरान जागा उपलब्ध करून देण्याची रितसर मागणी केली. तहसील प्रशासनानेही तत्काळ दखल घेत अंत्यसंस्कारासाठी लेखी मंजुरी दिली. त्याबाबतचा आदेशही काढला. परंतु, गायरान जागेवर अनेक वर्षांपासून महादेव लक्ष्मण गोरे या शेतकऱ्याचे अतिक्रमण आहे. त्याला त्या जागेचा प्रशासनाने पट्टाही दिला आहे. त्यामुळे ती जागा आता गोरे यांच्या मालकीची आहे. तो त्या जागेवर पिकांची लागवड करतो. सध्या त्याने शेतात कापसाची लागवड केली आहे. त्यामुळे तब्बल चाळीस तास मृतदेह गावात ठेवण्यात आला. अखेर गावकरी व अतिक्रमण धारक शेतकरी यांची समजूत काढली. गायरान जागेपैकी काही जागा स्मशानभूमीकरीता राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. आणि चाळीस तासानंतर मृत महिलेच्या शेतातच आज (दि. ९) सकाळी दहाच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना कोरपना तालुक्यातील नवेगाव येथे घडली. सरस्वती लक्ष्मण कातकर असे मृत महिलेचे नाव आहे. 

            तालुका प्रशासनाने अंत्यसंस्कार करण्याचा आदेश काढल्याने शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात आली. प्रशासन पोलीस फाटा घेऊन त्या ठिकाणी पोहोचला. तर अतिक्रमणधारक महादेव लक्ष्मण गोरे व त्याचे कुटुंबीयही पोहोचले. त्यांनी त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली. सध्या त्या शेतीमध्ये पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केल्यास मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होईल. त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, अशी विनंती प्रशासनाला केली. दरम्यान, शनिवारी पुन्हा अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. सरपंचाच्या मध्यस्थितीने गावकऱ्यांची आणि कुटुंबियांची समजूत काढण्यात आली. तालुका प्रशासनाने गायरान जमिनीपैकी काही जमिन कायमस्वरूपी स्मशानभूमीकरीता राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अंत्यसंस्कारास गावकरी तयार झाले. ग्राम पंचायतीने जागेची मोजणी करून स्मशानभूमीचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतातच अंत्यसंस्कार करण्यावर गावकरी तयार झाले. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास महसूल विभागाचे अधिकारी व पोलिस बंदोबस्तात चाळीस तासानंतर नवेगाव शेतशिवारात मृत महिलेच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासन आपले म्हणणे ऐकणार नसल्याचे दिसताच संतापलेल्या गोरे शेतकऱ्याने आपल्या कुटुंबियांसह अंत्यसंस्कार करण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. शुक्रवारी सायंकाळी मृतदेह अंत्यसंस्काराविना गावातच ठेवण्यात आला. महसूल प्रशासनाने अधिकारी व पोलिस कालपासूच गावात तळ ठोकून होते. गावकऱ्यांनी त्या गायरान जागेवरच अंत्यसंस्कार करण्यावर ठाम होते. तर अतिक्रमण धारक शेतकरी गोरे यांनी अंत्यसंस्कार शेतात होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्यांश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)